खासगी संस्थांच्या ताब्यातील मनोरंजन व खेळांची मैदाने ताब्यात घ्या - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

21 February 2018

खासगी संस्थांच्या ताब्यातील मनोरंजन व खेळांची मैदाने ताब्यात घ्या


मुंबई - मुंबई महानगरपालिकेने आपल्या मालकीची मनोरंजन व खेळाची मैदाने खासगी संस्थांना दिल्या आहेत. अशी मैदाने भाड्यावर देऊन संबंधित संस्था लाखो रुपयांचा महसूल मिळवत आहेत. त्यामुळे संस्थांना दिलेल्या मैदाने पालिकेने आपल्या ताब्यात घ्याव्यात अशी मागणी समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी केली. 

मुंबई महापालिकेच्या मालकीची मनोरंजन व खेळांची मैदान खासगी संस्थांच्या ताब्यात अाहे. या संस्था मैदाने भाड्यावर देतात आणि लाखो रुपये महसूल कमवतात. या संस्थांना पालिकेच्या जागा भाड्याने देण्याचा अधिकार नाही. या संस्था मैदाने भाड्याने देऊन मुंबईकरांच्या पैशांची लुट करत आहेत असा आरोप शेख यांनी केला. शेख यांच्या सूचनेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठींबा दिला. मुंबईतील 17 अशी मैदाने असून ती खासगी संस्थांकडून काढून घ्यावीत अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. त्यावर भाड्याने दिलेल्या मैदानाच्या जागांची सविस्तर माहिती मागवून पुठील बैठकीत सादर करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली.

Post Top Ad

test