Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मंत्रालयात आणखी एक आत्महत्या


मुंबई - धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच हर्षल रावते या 44 वर्षीय युवकानेही मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मंत्रालय इमारतीखाली जखमी अवस्थेत सापडल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून हर्षलनं उडी मारल्याचं समोर येत आहे, पण याला अद्याप पोलिसांचा दुजोरा मिळू शकलेला नाही. हर्षल मुंबईतल्या चेंबूर येथे वास्तव्यास असल्याचं त्याच्या ओळखपत्रांवरून लक्षात येतं. तो पैठणच्या कारागृहात शिक्षा भोगत असल्याचंही ओळखपत्रावरून समजलं. दरम्यान हर्षल पडला की, त्यानं उडी मारली याविषयी निश्चित काहीही कळू शकलं नाही. हर्षल रावते मेव्हणीच्या खुनाच्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत होता. त्याला कलम 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या खुल्या कारागृहात 4 वर्षांपासून शिक्षा भोगत होता आणि सध्या पॅरोलवर होता. आपली शिक्षा कमी करण्याच्या मागणीसाठी तो मंत्रालयात हेलपाटे घालत होता. मंत्रायलयात त्याला कोणी दाद देत नसल्याने त्याने आपले जीवन संपवले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. घटनेनंतर धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील आदी नेते मंत्रालयात पोहोचले. भाजप सरकारच्या काळात मंत्रालयाचं 'आत्महत्यालय' बनलं आहे, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावेळी केली होती. 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom