महापौरांच्या निवासस्थानावरून गटनेत्यांच्या बैठकीत खडाजंगी होणार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

07 February 2018

महापौरांच्या निवासस्थानावरून गटनेत्यांच्या बैठकीत खडाजंगी होणार


मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या निवासस्थानासाठी दादर शिवाजी पार्क येथील महापौर बंगला हे निवासस्थान आरक्षित आहे. मात्र या बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. महापौर बंगल्यात स्मारक उभारले जात असताना महापौरांच्या पर्यायी निवासस्थानासाठी पालिकेने अद्याप कोणतीही व्यवस्था केलेली नाही. यामुळे पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी मलबार हिल येथील बंगला महापौरांच्या निवासस्थानासाठी उपलब्ध करून द्यावा असा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीसमोर सादर केला आहे. महापौरांना पर्यायी जागा देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्याने गुरुवारी (८ फेब्रवारीला) होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत प्रशासन आणि गटनेत्यांमध्ये खडाजंगी होणार आहे.

महापौरांच्या निवासस्थानाच्या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार असल्याने महापौरांना पर्यायी निवासस्थान उपलब्ध करावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. महापौरांनी भायखळा येथील राणीबागेतील बंगला नाकारला आहे. मलबार हिल येथील पालिकेचा बंगला महापौरांच्या निवासासाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. मलबार हिल येथील पालिकेच्या बंगल्यात पालिकेच्या सेवेत नसलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा मुक्काम आहे. मलबार हिल येथील बंगला महापौरांच्या निवासस्थानासाठी तात्काळ रिकामा करावा अशी मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे. महापौर निवास व्यवस्थेसाठी काय कार्यवाही केली याचा अहवाल तातडीने सादर करा असे निर्देश मागील सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी प्रशासनाला दिले आहेत. पालिकेच्या मलबार हिल येथील जल अभियंत्यांच्या बंगल्यात माजी अतिरिक्त आयुक्त व सनदी अधिकारी पल्लवी दराडे व त्यांचे पती सनदी अधिकारी प्रवीण दराडे हे दांपत्य वास्तव्य करीत आहेत. त्यांना अनेक वेळा नोटिस देऊनही बंगला खाली करण्यात आलेला नाही. यामुळे महापौर निवासाचा तिढा निर्माण झाला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाला पत्र लिहून पालिकेचे बंगले बाहेरील अधिकाऱयांना देण्यास मनाई करण्याची मागणी केली आहे. तसेच महापौर निवासाचा विषय गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेला आणावा अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे. महापौर निवास स्थानाबाबत गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा होणार असल्याने या चर्चेदरम्यान पालिका प्रशासन आणि गटनेत्यांमध्ये खडाजंगी होणार आहे.

Post Top Ad

test