न्यायालयाचे आदेश येईपर्यंत मेट्रोसाठी वृक्षतोडीस स्थगिती - रामदास कदम - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

26 February 2018

न्यायालयाचे आदेश येईपर्यंत मेट्रोसाठी वृक्षतोडीस स्थगिती - रामदास कदम

मुंबई - मेट्रो रेल्वे कामासंदर्भात चालू असलेल्या आरे वसाहतीतील वृक्षतोडीबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत वृक्षतोडण्यास तात्पुरती स्थगिती द्यावी, असे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

यावेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक सी. एम. जाधव, सहायक महाव्यवस्थापक आर. ए. पाटील आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते. आरे वसाहतीतील वृक्षतोडीबाबत व त्यासंदर्भात कोर्टाने दिलेल्या आदेशाबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आरे वसाहतीतील वृक्षतोडीबाबत व त्यासंदर्भात कोर्टाने दिलेल्या आदेशाबाबत चर्चा करताना पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन, आतापर्यंत एकूण तोडलेले वृक्ष तसेच भविष्यात तोडाव्या लागणाऱ्या वृक्षांची संख्या किती असेल यासंबंधी बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी वृक्ष तोडीबाबत शासनाने दिलेल्या नियमाच्या अटी व शर्तीची पूर्तता करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Post Top Ad

test