उपहारगृहांच्या गच्चीवर शेड्स उभारण्यास परवानगी देऊ नये - आयुक्त - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 February 2018

उपहारगृहांच्या गच्चीवर शेड्स उभारण्यास परवानगी देऊ नये - आयुक्त


मुंबई । प्रतिनिधी -
कमला मिल आगीनंतर पालिकेने अग्निसुरक्षेबाबत कारवाई सूर केली आहे. याचाच एक भाग म्हणून उपहारगृहाच्या गच्चीवर उभारण्यात येणारे शेड्स अग्निसुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकतात. यामुळे उपहारगृहांच्या गच्चीवर कोणत्याही प्रकारचे शेड्स उभारण्यास परवानगी देऊ नये असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मासिक आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

अनेक उपहारगृहांच्या गच्चीवर पावसाळ्याच्या काळात 'शेड' उभारले जाते. हे शेड अग्निसुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकते. ही बाब लक्षात घेऊन यापुढे उपहारगृहांच्या गच्चीवर कोणत्याही प्रकारचे शेड उभारण्यास परवानगी देऊ नये. पावसाळ्याच्या काळात किंवा अन्य कोणत्याही परिस्थितीत देखील उपहारगृहांच्या गच्चीवर 'शेड' उभारण्याची परवानगी देण्यात येऊ नये. तसेच ज्या ठिकाणी असे 'शेड' आढळून येतील, ते तात्काळ तोडावेत, असे आदेश आयुक्तांनी दिले.

उपहारगृहांमध्ये लाकडी जिने, भिंतीवरील लाकडी आच्छादन किंवा लाकडी 'पार्टिशन' यासारख्या ज्वलनशीलबाबी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने घातक ठरू शकतात. तसेच उपहारगृहामधील जिन्याची रुंदी ही नियमानुसार किमान १.५ मीटर असणे बंधनकारक आहे. ज्याठिकाणी ही रुंदी कमी आढळून येईल, अशा ठिकाणी तात्काळ नोटीस देऊन त्यावर नियमांनुसार कारवाई करावी असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिका क्षेत्रातील फर्निचरची दुकाने, प्लास्टिक वस्तुंची विक्री करणारी दुकाने, रसायन विक्री करणारी दुकाने; यासारख्या ज्वलनशील वस्तुंची विक्री करणा-या किंवा साठा असणा-या आस्थापनांची तपासणी करावी. या तपासणीदरम्यान नियमबाह्यबाबी आढळून आल्यास त्यावरही तात्काळ कारवाई करावी असे आदेश बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत.

Post Bottom Ad