प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला १२ हजार १२३ घरे - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

08 February 2018

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला १२ हजार १२३ घरे

नवी दिल्ली - प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील १३ शहरांमध्ये एकूण १२ हजार १२३ परवडणारी घर बांधणीस केंद्राने मंजुरी दिली आहे. 

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या केंद्रीय देखरेख व मंजुरी समितीच्या ३० व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या समितीने देशात १ लाख ८६ हजार ७७७ परवडणाऱ्या घरांना मंजुरी दिली. महाराष्ट्रासह हरियाणा, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात , बिहार, केरळ, उत्तराखंड आणि ओडिशा या राज्यांचा यात समावेश आहे. या समितीच्या मंजुरीनुसार महाराष्ट्रात एकूण १२ हजार १२३ परवडणारी घरे बांधण्यासाठी केंद्र शासनाकडून ८६८ कोटींच्या गुंतवणुकीसह १८२ कोटींचे सहाय्य देण्यात येणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी) लाभार्थींच्या बांधकामासाठी देशातील १ लाख ८ हजार ९५ घर बांधणीस मंजुरी देण्यात आली असून यात महाराष्ट्रासाठी ७ हजार ८८ घर बांधणीस मंजुरी मिळाली आहे.

Post Top Ad

test