मुंबईतील स्‍मशान भूमिंना सवलतीत पाईप गॅस द्या - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 February 2018

मुंबईतील स्‍मशान भूमिंना सवलतीत पाईप गॅस द्या


मुंबई | प्रतिनिधी -
पर्यावरण पुरक असणारा पाईप गॅस मुंबईतील स्‍मशान भूमीना सवलतीने देण्‍यात यावा अशी मागणी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची आज दिल्‍लीत भेट घेऊन केली.

नॅचरल गॅस हा पर्यावरण पुरक असून स्‍मशान भूमींना तो सवलतीने उपलब्‍ध करून दिल्‍यास लाकाडाचा वापर करून पर्यायाने झाडांची कत्‍तल कमी होऊ शकेल. तसेच लाकडाच्‍या जळण्‍यामुळे निर्माण होणारा धुर व त्‍याचे प्रदुषण कमी करण्‍यात मदत होईल. म्‍हणून सवलतीच्‍या दराने पाईप गॅस उपलब्‍ध करून देण्‍यात यावा अशी मागणी शेलार यांनी केली आहे. सांताकुझ पश्चिम येथे स्‍थानिक नागरीकांनी एकत्र येऊन नॅचरल गॅसवर चालणारी विद्यृत दाहिनी उभारून पर्यावरण पुरक स्‍मशानभूमी उभी केली आहे. या स्‍मशान भूमीलाही सवलतीने गॅस मिळावा अशी विनंती करतानाच अशाच प्रकारे मुंबईतील सर्वच स्‍मशान भूमिंमध्‍ये पाईपने गॅस पुरवाठा सवलतीने करण्‍यात यावा अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

Post Bottom Ad