Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी जोरदार चुरस निर्माण होणार


शिक्षण समिती अध्यक्षपदावर नवा चेहरा -
मुंबई | प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडे पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असतात. या समितीवर वर्णी लागावी अशी सर्वच नगरसेवकांची अपेक्षा असते. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली जाते. अशा या स्थायी समितीमधून मुंबई महानगरपालिकेतील भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीचे गटनेते निवृत्त झाले आहे. तर सत्ताधारी शिवसेनेच्या महत्वाच्या नगरसेवकांची निवृत्ती झाली नसल्याने येत्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. तसेच शिक्षण समितीच्या अध्यक्षपदीही नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीवर मुंबई महापालिकेतून निवडणूक आलेल्या नगरसेवकांपैकी २६ नगरसेवकांची वर्णी लावली जाते. स्थायी समितीचा वर्षाचा असून दरवर्षी एप्रिल महिन्यात नव्या सदस्यांची व अध्यक्षांची निवड केली जाते. यासाठी दरवर्षी २६ पैकी १३ सदस्यांना चिठ्ठयांद्वारे निवृत्त केले जाते. नुकत्याच संपन्न झालेल्या स्थायी समितीत निवृत्त आणि राहिलेल्या सदस्यासाठी चिट्ठ्या काढण्यात आल्या. यात भाजपाचे गटनेते मनोज कोटक, काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्ष नेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव तीन गटनेते निवृत्त झाले आहेत. तर सत्ताधारी शिवसेनेचे गटनेते यशवंत जाधव व समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख हे दोनच गटनेते स्थायी समितीत राहिले आहेत. याच बरोबर स्थायी समितीमधून अखिल भारतीय सेनेच्या गिता गवळी, भाजपाचे मकरंद नार्वेकर, सुनिता यादव, पराग शाह, राजश्री शिरवडकर, अभिजित सामंत, विद्यार्थी सिंग तर सत्ताधारी शिवसेनेचे राजुल पटेल, सुजाता सानप व मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेले दिलीप लांडे हे निवृत्त झाले आहेत. तर शिवसेनेचे सध्याचे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, संजय घाडी, आशिष चेंबूरकर, यशवंत जाधव, सदानंद परब, समीक्षा सक्रे, मंगेश सातमकर, सुजाता पाटेकर, भाजपचे अलका केरकर, प्रभाकर शिंदे, काँग्रेसचे आसिफ झकेरिया, कमरजहाँ सिद्दीकी व समाजवादीचे रईस शेख स्थायी समितीत राहिलेले आहेत. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये ६ नगरसेवक भाजपाचे आहेत. तर शिवसेनेचे सदस्य कमी निवृत्त झाल्याने येत्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सध्याचे अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सभागृह नेते यशवंत जाधव, आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर यांच्यामध्ये जोरदार चुरस निर्माण होणार आहे.

शिक्षण समितीसाठी नव्या अध्यक्षांची वर्णी ? -
पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुडेकर या शिक्षण समितीमधून निवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण समिती अध्यक्षपदावर यंदा नव्या नगरसेवकाला संधी मिळणार असल्याचे वृत्त आहे. गुडेकर यांच्यासह स्नेहल आंबेकर, आसावरी पाटील, संध्या दोषी, श्रीकला पिल्लाई, विनोद मिश्रा, राजपती यादव, सईदा खान, विन्नी डिसोझा, संगीत हंडोरे बिगर पालिका सदस्य असलेले आरती पुगावकर, राहुल कणाला हे निवृत्त झाले आहेत. तर शितल म्हात्रे, अनुराधा पोतदार, राम बारोट, चंद्रावती मोरे, प्रज्ञा धुपकर, बिंदू त्रिवेदी, अनिष मकवाणी, सुनिता यादव, अंजली नाईक, सचिन पडवळ, अश्विनी माटेकर व बिगर सदस्य असलेले साईनाथ दुर्गे, सुरेंद्रकुमार सिंग हे सदस्य समितीमध्ये राहिले आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom