Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

जुन्या इमारतींची दुरुस्ती करणाऱ्या रहिवाशांना करात सवलत द्या


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत १०० वर्षांहून अधिक जुन्या इमारती आहेत. दुरुस्ती न झाल्यामुळे या इमारती मोडकळीस आल्या आहेत. इमारती जुन्या असल्याने मुंबईचे सौंदर्य कमी होते. त्यामुळे अशा पुरातन इमारतींची दुरुस्ती करणाऱ्या रहिवाशांना करात सवलत मिळावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक राम बारोट यांनी ठरावाच्या सूचनेव्दारे केली आहे.

मुंबई शहर हे भारतातील आर्थिक, औद्योगिक व पर्यटनच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , महापालिका इमारत रिझर्व्ह बँक आदी पुरातन वास्तू मुंबईच्या सौंदर्यात भर टाकतात. मुंबईत विविध धार्मिक स्थळे, वस्तुसंग्रहालये, समुद्रकिनारे, बागा आणि उद्याने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र मुंबईत इतर अनेक इमारती आहेत ज्या १०० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. त्यांची वेळीच दुरुस्ती न झाल्यामुळे मोडकळीस आल्या आहेत. अशा इमारतींमुळे मुंबईचे सौंदर्य कमी होते. त्यामुळे मुंबईतील मुख्य रस्त्याशेजारी १०० वर्षांहून अधिक जुन्या असणाऱ्या इमारतींची त्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी पुढाकार घेऊन दुरुस्ती केल्यास अशा इमारतींना पुढील १० वर्षांच्या मालमत्ता करामध्ये योग्य प्रमाणात सूट द्यावी. त्यामुळे इमारतींना नवीन स्वरूप प्राप्त होऊन मुंबईच्या सौंदर्यात भर पडेल असे त्यांनी ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे. ही ठरावाची सूचना येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom