मध्य रेल्वेवर फुकट्या प्रवाशांकडून १३० कोटींची दंड वसुली


मुंबई । प्रतिनिधी -
मध्य रेल्वेवर विनातिकीट, ठराविक अंतरापेक्षा जास्त जास्त प्रवास करणाऱ्या, तसेच बेकायदेशीर सामानाची वाहतूक करणाऱ्या प्रवाशांकडून एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या दहा महिन्यात १३० कोटी ४४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मध्य रेल्वेने जानेवारी २०१८ मध्ये फुकट्या प्रवाशांविरोधात २.१६ लाख गुन्ह्यांची नोंद केली असून, त्यांच्याकडून ९ कोटी ३५ लाखाचा दंड वसुल केला आहे. तर २०१७ मध्ये १.९४ लाख गुन्ह्यांची नोंद झाली असून, ८ कोटी ३५ लाखांचा दंड वसूल केला होता. दरम्यान यावर्षी ११.३२ टक्क्यांनी रक्कमेत वाढ झाली आहे. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या दहा महिन्यांमध्ये फुकट्या प्रवाशांविरोधात २६ लाख ५७ हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामधून १३० कोटी ४४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवाशांनी विनातिकीट तसेच तिकिटावर असलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Tags