मार्च अखेरपर्यंत काळबादेवी चिमण्यामुक्त - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 March 2018

मार्च अखेरपर्यंत काळबादेवी चिमण्यामुक्त


मुंबई । प्रतिनिधी - काळबादेवी येथे तीन वर्षांपूर्वी आगीची दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेनंतर काळबादेवी येथील सोने - चांदी गाळणा-या चिमण्यांवर पालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. येथील सर्वच्या सर्व चिमण्या मार्चअखेरपर्य़ंत काढण्याचे आदेश असल्याने उर्वरित सुमारे 300 चिमण्या काढण्यासाठी पालिकेच्या अधिका-यांची धावपळ उडाली आहे.

काऴबादेवी येथील मागील अनेकवर्षापासून असलेल्या सोने- चांदी गाळणा-या चिमण्या काढण्याचा निर्णय़ पालिकेने घेतला आहे. शहरात आगीच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने या चिमण्या हटवण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. मागील दोन महिन्यांपासून पोलिसांच्या सुरक्षेत कारवाई सुरु आहे. मार्च अखेर पर्यंत सर्व म्हणजे जवळपास 750 चिमण्या काढण्याचा निर्णय़ पालिकेने घेतला आहे. आतापर्यंत 300 चिमण्या राहिल्या असून, मार्च अखेरपर्यंत काढाव्या लागणार आहेत. त्यामुळे अवघे 15 दिवस उरल्याने ही कारवाई अजून तीव्र केली जाणार असल्याची माहिती पालिका अधिका-याने दिली.

तीन वर्षापूर्वी काऴबादेवी येथे लागलेल्या भीषण आगीशी झुंज देणा-या चार अधिका-यांना शहिद व्हावे लागले. या दुर्घटनेनंतर येथील अरुंद गल्ल्या, दाटीवाटीने व्यवसाय लावणारे फेरीवाले तसेच अनधिकृतपणे सोने -चांदी गाळणा-या चिमण्यांवर पालिकेने कारवाईला सुरुवात केली. येथे सोने - चांदीच्या व्यावसायिकांनी या कारवाईला तीव्र विरोध केला. मात्र तरीही पालिकेने महिना -दीड महिने येथील कारवाईला सुरू ठेवली. त्यावेळी 2200 चिमण्या होत्या. मात्र यातील काही चिमण्या पालिकेने काढून टाकल्याने सुमारे साडेसातशे चिमण्या उरल्या होत्या. मात्र त्यानंतर पालिकेची कारवाई थंडावल्याने अनधिकृत व्यावसायिकांनी पुन्हा आपले बस्तान बांधले. यांत साडे सातशे चिमण्याही पुन्हा सक्रीय झाल्या. त्यानंतर कमला मिल कंपाऊंड येथील आग दुर्घटनेनंतर अनधिकृत व्यावसायिकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऎरणीवर आला. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील चिमण्या काढून टाकण्याचे आदेश पालिकेला दिले. येथे सुमारे 750 चिमण्या असून यावरील सर्व अनधिकृत आहेत. आतापर्यंत झालेल्य़ा कारवाईनंतर येथे सुमारे 300 चिमण्या उरल्या आहेत.

पालिकेने 2013 साली येथील सर्वेक्षण सुरू केले. त्यावेळी येथे 2200 चिमण्या होत्या. मागील तीन वर्षात यातील 1600 चिमण्या पालिकेने काढून टाकल्या. मात्र ही कारवाई अत्यंत धिम्यागतीने होती. आता तीन वर्षानंतर पुन्हा कारवाई सुरु केली आहे. काळबादेवी, नारायणवाडी, विठ्ठलवाडी, झवेरी बाजार, जंजीकर मार्ग, पोपळेवाडी, तेलगल्ली, कॉटन एक्सचेंज मुंबादेवी परिसरातील रहिवासी शहरीकरणाच्या विस्तारामुऴे उपनगरांमध्ये विस्तारले व जागांवर सोन्या -चांदीच्या व्यवसायिकांनी बस्तान मांडले. येथे सोने घडणावळीचे तसेच दागिने पॉलिस करण्याचे काम सुरू झाले. मात्र या उद्योगामुळे परिसरात निर्माण होणा-या दूषित धुरामुळे येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. या निर्णय़ामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

Post Bottom Ad