मालमत्ता कराची ५२५ कोटी रुपयांची थकीत रक्कम वसूल करा - अनंत नर

JPN NEWS

मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेचे महत्त्वाचे उत्पन्न स्रोत असलेला जकात बंद झाल्यानंतर महसूल मिळवण्याचा सर्व भार मालमत्ता करावर अवलंबून आहे. मात्र, मुंबईतील मालमत्ता कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात असून यात औद्योगिक कंपन्या, व्यावसायिक यांची सुमारे ५२५ कोटींची थकबाकी आहे. पालिका ही नागरी सुविधा देणारी स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात पालिका अधिकाऱ्यांनी दिरंगाई करणे योग्य नाही. ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. मागील दोन वर्षांपासून अनेक मोठ्या उद्योगांकडून ५२४ कोटी ९६ लाख ८ हजार १२५ रुपये एवढी रक्कम मालमत्ता करापोटी येणे बाकी आहे. एवढ्या मोठ्या थकीत रकमेमुळे या खात्याबाबतच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित होते. त्यामुळे आयुक्तांनी या खात्याच्या एकूणच कार्यपद्धतीचा आढावा घेऊन थकबाकी थकण्याची कारणे शोधून उपाययोजना करावी, अशी मागणी नर यांनी केली आहे.

पालिकेचे मालमत्ता थकबाकीदार -
आस्थापनांचे नाव    एकूण मालमत्ता     थकीत रक्कम 
१ लार्सन अँड ट्र्ब्रो             ११              ८९ कोटी ४२ लाख ६८ हजार ९५४ 
२ एच डी आय एल          १७५             २६० कोटी ७० लाख ९२ हजार ३८१
३ फिनिक्स मिल              ०२               ४६ कोटी ६१ लाख ८७ हजार ९२४
४ निर्मल लाइफस्टाइल      ०९               २० कोटी ४२ लाख २२ हजार ३९
५ क्राऊन मिल                  ०१                ३ कोटी ४० लाख ६७ हजार २२०
६ सहारा हॉटेल                 ०१                 १ कोटी ९१ लाख ४५ हजार १०
७ कोहिनुर प्लॅनेट             ०१               १५ कोटी ३३ लाख ७५ हजार ५६०
८ इतर १०० थकबाकीदारांची थकीत रक्कम ९७ कोटी १२ लाख ४९ हजार 
एकूण रक्कम   ५२४ कोटी ९६ लाख ८ हजार १२५
Tags