Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

रस्ते घोटाळ्यातील अभियंत्यांना इंजिनिअर्स असोसिएशन न्याय मिळवून देणार


मुंबई | प्रतिनिधी - रस्ते खात्यातील दोषी ठरविलेल्या 180 अभियंत्यांची चौकशी करून त्यांच्यावर खोटे आरोप ठेवण्यात आल्याचा दावा म्युनिसिपल इंजिनिअर्स असोशिएशने केला आहे. त्यांना न्याय मिळवून देवू असा निर्धारही असोशिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

रस्ते खात्यातील अभियंत्यांची चुकीच्या पध्दतीने चौकशी केली असून त्यांच्यावर खोटे आरोप केले असून त्यांच्यावर ठपका ठेवून त्यांना पकडून देण्यात आले असल्याचेअसोशिएशनने म्हटले आहे. संघटनेच्या वतीने सर्वांना न्याय मिळवून देवू असा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत झाला. या सभेत असोशिएशनच्या कार्यकारिणीची निवड झाली. कार्याध्यक्षपदी अभियंते नवनाथराव घाटगे, सरचिटणीसपदी ऍड. महाबळ शेट्टी, उपाध्यक्षपदी अभियंते रमेश मालविय, विजय पाचपांडे, राजेंद्र जोशी, जीवनराव पाटील, रमेश भुतेकर, संजय खराडे, कोषाध्यक्षपदी रमेश राघव तर चिटणीसपदी अभियंते जगन्नाथ गव्हाणे, दीपक चौगुले, यशपाल हंगरगेकर आदींची निवड झाली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom