नाल्याच्या प्रवाहास अडथळा ठरणारी प्रभादेवीतील अतिक्रमणे तोडली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2018

नाल्याच्या प्रवाहास अडथळा ठरणारी प्रभादेवीतील अतिक्रमणे तोडली


मुंबई । प्रतिनिधी - प्रभादेवी परिसरातील कामगार-नगर लगत 'टेक्सटाईल मिल नाला' हा सुमारे २० मीटर रुंदी असणारा मोठा नाला आहे. या नाल्याच्या पात्रात आणि पात्राजवळ गेल्या काही महिन्यात ५२ अतिक्रमणे अनधिकृतपणे उभारण्यात आली होती. 'एफ दक्षिण' व 'जी दक्षिण' या दोन विभागातून आणि सेनापती बापट मार्ग, फीतवाला लेन यासारख्या महत्त्वाच्या परिसरातून जाणा-या या अतिक्रमणांमुळे पाण्याच्या प्रवाहास अडथळा होऊन पावसाळ्यादरम्यान लगतच्या परिसरात पाणी साचण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन सदर ५२ अनधिकृत बांधकामांसह ८ वाढीव बांधकामे नुकत्याच करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आली आहेत. तसेच दुस-या एका कारवाई दरम्यान तोडी मथुरादास मिल कंपाऊंड मधील १० अनधिकृत शेड व वाढीव बांधकामे देखील तोडण्यात आली आहेत, अशी माहिती 'जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी दिली आहे.

महापालिकेच्या परिमंडळ – २ चे उपायुक्त नरेंद्र रामकृष्ण बर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार 'जी दक्षिण' विभागाद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान कामगार नगर परिसरातील ५२ अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे आणि ८ वाढीव बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे नाल्याच्या प्रवाहातील संभाव्य अडथळा दूर होण्यासोबतच परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत महापालिकेच्या 'जी दक्षिण' विभागाचे ३५ कामगार – कर्मचारी - अधिकारी सहभागी झाले होते. तसेच या कारवाईसाठी एका पोकलेनसह इतर आवश्यक वाहने आणि साधनसामुग्री वापरण्यात आली. दुस-या एका अतिक्रमण निर्मूलन कारवाई दरम्यान परळ परिसरातील सेनापती बापट मार्गावरील 'तोडी मथुरादास मिल कंपाऊंड' आवारातील 'इंडस्ट्रीयल इस्टेट' मधील १० अनधिकृत 'शेड' व वाढीव बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाईकरण्यासाठी महापालिकेचे १० कामगार – कर्मचारी - अधिकारी सहभागी झाले होते. तसेच १ जेसाबी व इतर साधनसामुग्री देखील आवश्यकतेनुसार वापरण्यात आली, अशीही माहिती देवेंद्र जैन यांनी दिली आहे.

Post Bottom Ad