मुंबई महापालिकेच्या विविध समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

15 March 2018

मुंबई महापालिकेच्या विविध समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर


मुंबई । प्रतिनिधी – देशातील श्रीमंत महापालिका म्हणून नाव लौकिक असलेल्या मुंबई महापालिकेचा कारभार सभागृह, वैधानिक व विशेष समित्यांद्वारे चालवण्यात येते. या समित्यांची निवडणूक दरवर्षी होत असून सन २०१८ - १९ साठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम पालिका प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे. यानुसार एप्रिल महिन्यात या निवडणूका होणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती, बेस्ट समिती या वैधानिक तर स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे), सार्वजनिक आरोग्य समिती, बाजार व उद्यान समिती, विधी समिती, महिला व बाल कल्याण या विशेष समित्यांच्या अध्यक्ष पदाची निवडणूक एप्रिल महिन्यात होत आहे. स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती, बेस्ट समिती या वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठी २ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे), सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षपदासाठी १२ एप्रिल तर बाजार व उद्यान समिती, विधी समिती, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी १३ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत. वैधानिक समित्यांपैकी शिक्षण समिती व स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ५ एप्रिलला, बेस्ट समिती व सुधार समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ एप्रिलला, विशेष समित्यांपैकी स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे), सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक १६ एप्रिलला तर बाजार व उद्यान समिती, विधी समिती तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक १७ एप्रिलला होणार आहे.

मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा नगरसेवकांमुळे सत्ताधारी शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. मनसेमधून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांची वर्णी विविध समित्यांवर लावण्यात आली आहे. शिवसेनेने पालिकेत भाजपाचे प्रस्थान वाढत असल्याने भाजपाला लगाम लावण्यासाठी आपल्या जुन्या व अनुभवी अशा नगरसेवकांना अध्यक्षपदावर बसवण्याची व्युव्हरचना बनवली आहे. त्याप्रमाणे शिक्षण समितीच्या अध्यक्षपदावर मंगेश सातमकर, सुधार समितीवर मनसेतून शिवसेनेत आलेले दिलीप लांडे, बेस्ट समितीवर आशिष चेंबूरकर, स्थापत्य समिती (शहर)वर किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती निश्चित मनाली जात आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरही रमेश कोरगांवकर यांच्या जागी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतर समित्यांवर मात्र नव्या चेहऱ्याना संधी दिली जाणार असल्याचे समजते.

समित्यांच्या निवडणुकीची तारीख -
शिक्षण समिती - ५ एप्रिल
स्थायी समिती - ५ एप्रिल
बेस्ट समिती - ६ एप्रिल
सुधार समिती - ६ एप्रिल
स्थापत्य समिती (शहर) - १६ एप्रिल
स्थापत्य समिती (उपनगरे) - १६ एप्रिल
सार्वजनिक आरोग्य समिती - १६ एप्रिल
बाजार व उद्यान समिती - १७ एप्रिल
विधी समिती - १७ एप्रिल
महिला व बाल कल्याण - १७ एप्रिल

Post Top Ad

test
test