Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महापालिका शाळांमधील मुलींच्या मुदतठेव योजनेत दुप्पट वाढ


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींची उपस्थिती वाढावी म्हणून उपस्थिती भत्ता दिला जात होता, त्यात बदल करून विद्यार्थिनीच्या नावे मुदत ठेव ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. आता येत्या शैक्षणिक वर्षांपासून मुदतठेवीमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची पटसंख्या वाढवण्यासाठी २००७ - ८ पासून प्रोत्साहन भत्ता म्हणून दिवसाला एक रुपये देण्यात येत होता. असा प्रोत्साहन भत्ता २००९-१० पर्यंत वाटप करण्यात आला. २०१० - ११ पासून यात बदल करून पहिलीमध्ये दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या नावे १ हजार रुपये मुदतठेव म्हणून ठेवले जात होते. ती विद्यार्थिनी सातवी पास झाल्यावर २ हजार रुपये दिले जात होते. त्यात अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे यांनी २०१७ - १८ पासून बदल केला आहे. याआधी ७ पास झालेल्या विद्यार्थिनीला मुदत ठेव रक्कम दिली जात होती. ती येत्या शैक्षणिकी वर्षापासून ८ पास झालेल्या विद्यार्थिनीला देण्यात येणार आहे. मुदतठेव म्हणून देण्यात येणाऱ्या रक्कमेतही दुप्पट वाढ करण्यात आली आहे. आधी २५०० रुपये मिळणारी मुदतठेव आता ५ हजार रुपये करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. स्थायी समितीनंतर पालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सध्याची योजना                         नवीन योजना
१ ली ते ७ वी २५०० रुपये      १ ली ते ८ वी ५००० रुपये
२ री ते ७ वी २३०० रुपये       २ री ते ८ वी ४४०० रुपये
३ री ते ७ वी २१०० रुपये       ३ री ते ८ वी ३८०० रुपये
४ थी ते ७ वी १४०० रुपये      ४ थी ते ८ वी ३२०० रुपये
५ वी ते ७ वी ११०० रुपये       ५ वी ते ८ वी २६०० रुपये
६ वी ते ७ वी ८०० रुपये         ६ वी ते ८ वी २००० रुपये
७ वी ते ७ वी ५०० रुपये         ७ वी ते ८ वी १५०० रुपये
-------------                        ८ वी ते ८ वी १००० रुपये

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom