Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पालिकेच्या २३ शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर उभारणार !


मुंबई । प्रतिनिधी - येत्या शैक्षणिक वर्षात पालिकेच्या २१ प्राथमिक व २ माध्यमिक अशा एकूण २३ शाळांमध्ये लघु विज्ञान केंद्रे(मिनी सायन्स सेंटर्स) उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी कंत्राटदाराला ६२ लाखांचे कंत्राट दिले असून यासंदर्भातील प्रस्तावाला बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. 

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मुंबई मनपाच्या शिक्षण विभागातील १२० प्राथमिक व ५५ माध्यमिक शाळांमध्ये विज्ञान ,गणित व भूगोल या विषयांच्या अभ्यासक्रमातील विविध संकल्पना, सिध्दांत, नियम ,प्रमेय इ .चे सहज आकलन व उपयोजन स्वरूपात अध्ययन करण्यासाठी चलीत प्रतिकृतीने (वर्किंग मॉडेल ) सुसज्ज लघु विज्ञान केंद्रे उभारण्यात आली होती.शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये मनपाच्या २१ प्राथमिक व २ माध्यमिक अशा एकूण २३ शाळांमध्ये लघु विज्ञान केंद्रे स्थापन करणे आवश्यक असल्याचे पालिका प्रशासनाने म्हणणे आहे.यासाठी मे. स्टेम लर्निंग प्रा.लि. या कंपनीला ६२ लाख ७४ हजार रुपयांचे कंत्राट दिलें आहे.दरम्यान, मनपा शाळांत मिनी सायन्स सेंटर्स उभारण्यासाठी पालिकेने गतवर्षी प्रमाणेच यंदाही अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom