Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

वार्डबॉय, आयांना मिळणार वागणुकीचे तसेच मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांना विशेषकरून वार्डबॉय आणि आया यांच्याकडून चांगली वागणूक मिळत नाही. रुग्णांना चांगली वागणूक मिळत नसल्याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने वॉर्डबॉय आणि आयांना रुग्णांशी कसं वागायचं, बोलायचं याबाबतचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या आरोग्य समितीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी काही माहिती विचारल्यास आया व वॉर्डबॉयकडून नीट उत्तर दिले जात नाही ‘अहो, तुम्हाला एकदा सांगितलं ना…तिकडे बसा..डॉक्टर कुठेत माहित नाही..कितीदा सांगायचं..एकदा सांगून कळत नाही’ वॉर्डबॉय किंवा आयाबाईंचं हे ठरलेलं वाक्य. काहीवेळा दरडावलेही जाते. कित्येक रुग्णालयात वार्ड बॉय आणि आया नुसत्या बसून असतात. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक तायांच्यकडे मदत मागायला गेल्यास ओरडून मदत न देताच परत पाठवले जाते. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादही होतात. कर्मचाऱ्यांनी रुग्ण आणि नातेवाईकांसोबत बोलताना नीट बोलावे. रुग्ण किंवा नातेवाईकांशी बोलताना संवाद कसा करावा यासाठी महापालिकेने वॉर्डबॉय आणि आयांना ‘बिहेविअर ट्रेनिंग’ देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या आरोग्य समितीत याबाबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. तसेच कर्मचारी कामावर दाऊ पिऊन येतात अशा तक्रारी आहेत. अशा कर्मचाऱयांवर कारवाई कर्मचाऱ्यांचे निर्देशही आरोग्य समिती अध्यक्ष रोहीणी कांबळे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण - 
पालिकेच्या नायर रुग्णालयात दीड महिन्यांपूर्वी एमआरआय मशिनमध्ये अडकल्याने एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. त्यामुळे वॉर्डबॉय आणि आयांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात यावं अशी मागणी नगरसेवकांनी आरोग्य समितीकडे केली होती.परिचारिका आणि डॉक्टरांपेक्षा रुग्णांचा जास्त संबंध वॉर्डबॉय आणि आयांशी येतो. त्यामुळे पालिका रुग्णालयांतील वॉर्डबॉय आणि आयांना रुग्णसेवेबाबत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. एमआरआय आणि सिटीस्कॅन विभागातील मशीन कशा पद्धतीनं हाताळायच्या याचं प्रशिक्षण डॉक्टर तसेच कंपनीच्या अधिकारयांकडून दिले जाणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom