Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

केईएम रुग्णालयात स्लॅब कोसळून दोन रुग्ण जखमी


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील डायलेसिस विभागाचा बुधवारी रात्री स्लॅब कोसळला. या घटनेत डायलेसिस विभागातील दोन रुग्ण किरकोळ जखमी झाले आहेत.

केईएम मुंबईतील सर्वात मोठं रुग्णालय आहे. केईएममध्ये दररोज हजारो रुग्ण दाखल होत असतात. रात्री साडे आठच्या सुमारास येथील दुस-या मजल्यावरील “प्लास्टर आणि एसी सिलिंग पडल्याने हा अपघात झाला. दोन रुग्णांना या अपघातात किरकोळ खरचटलं आहे. आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी डायलेसिस युनिट दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करत आहोत. डायलेसिस गुरूवारपासून पुन्हा सुरू होतील. येत्या तीन-चार दिवसात पूर्णत डायलेसिस प्रक्रिया पूर्ववत केली जाईल.” अशी माहिती तेथील डॉक्टरांनी दिली. या डायलेसिस विभागात ८-९ खाटांची सोय करण्यात आली आहे. घटना घडली तेव्हा येथे चार रुग्ण होते. दिवसाला २०-२५ किडनी रुग्णांच डायलेसिस करण्यात येते. दिवसा येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने अनर्थ टळला. दरम्यान, इमारत खूप जुनी असल्याने या इमारतीची दुरुस्ती केली जाणार होती. मात्र त्यापूर्वीच स्लॅब कोसळल्याने या विभागातील रुग्णांना शिफ्ट करण्य़ात आले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom