​मृत्युंजय : प्रदर्शनाच्या वाटेवर...​ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2018

​मृत्युंजय : प्रदर्शनाच्या वाटेवर...​


मुंबई । संतोष खामगांवर ​
'पाऊलखुणा' आणि 'वाघी' यांसारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित करणा-या संदीप साळगांवकर यांचा 'मृत्युंजय' हा सिनेमा आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. कोंकणी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा अभिनेता सलिल नाईक या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच मराठी सिनेमात दिसणार आहे. माधवी जुवेकर, नारायण जाधव, सनीभूषण मुणगेकर, गणेश गवस यांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. ​स्वप्नील मनवळ यांनी या सिनेमाच्या चित्रिकरणाची जबाबदारी पार पाडली असून नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारा विचार या सिनेमाच्या माध्यमातून मांडला आहे, अशी माहिती संदीप साळगांवकर यांनी दिली. त्र्यंबकेश्वरमध्ये संपूर्ण चित्रिकरण झालेला हा सिनेमा त्याचं आगळंवेगळं कथानक व सादरीकरणामुळे सर्वांनाच आवडेल, असा विश्वास संदीप साळगावंकर यांना वाटतोय. साळगांवकर एन्टरप्रायझेसने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Post Bottom Ad