Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मध्य रेल्वेवर फुकट्या प्रवाशांकडून १४३ कोटींची दंड वसुली


मुंबई । प्रतिनिधी - मध्य रेल्वेवर विनातिकीट, अवैध प्रवाशांविरोधात एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत केलेल्या कारवाईत तब्बल १४३ कोटी २१ कोटी रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने एकट्या फेब्रुवारी महिन्यात फुकटे प्रवासी, अन्य प्रवाशांच्या नावावर प्रवास करणारे प्रवासी, आरक्षण न केलेले सामान आदींचे २ लाख ५५ हजार गुन्हे नोंदवले. त्या तुलनेत गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये १ लाख ९७ हजार प्रकरणे नोंदवण्यात आली होती. ही वाढ २९.४९ टक्के आहे. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये दंडाची रक्कम १२ कोटी ७७ लाख रुपये आहे. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये दंडाची रक्कम आठ कोटी ८२ लाख रुपये इतकी होती. ही वाढ जवळपास ४५ टक्के इतकी आहे. दंडाच्या रक्कमेचा आढावा घेताना एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत दंडाची रक्कम ११७ कोटी ७२ लाख रुपये इतकी आहे. ही वाढ सुमारे २२ टक्के इतकी आहे. आरक्षित तिकिटे अनधिकृतपणे हस्तांतरित करण्याची १४३ प्रकरणे आढळली असून त्यातून एक लाख ३८ हजार रुपये दंडातून वसूल करण्यात आले आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom