Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

ऑटो‍रिक्षा, टॅक्सीचालकांविरुद्ध तक्रारीसाठी जनजागृती करणार - दिवाकर रावते


मुंबई, दि. 16 : मुंबई शहरातील ऑटो‍रिक्षा / टॅक्सीचालकांविरुद्ध तक्रारी करण्यासाठी परिवहन विभागामार्फत टोल फ्री सुविधा आणि हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या हेल्पलाईन व टोल फ्री क्रमांकाविषयी जनजागृती होण्यासाठी सर्व टॅक्सी व रिक्षात हे क्रमांक लावण्याविषयीच्या सूचना देण्यात येतील, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

सदस्य आनंद ठाकूर यांनी मुंबईतील रिक्षा-टॅक्सींच्या समस्येविषयी लक्षवेधी उपस्थित केली होती. यास उत्तर देताना रावते बोलत होते. मुंबई शहरातील ऑटो‍रिक्षा, टॅक्सीचालकांविरुद्ध प्रवाशांना तक्रारी करण्यासाठी परिवहन विभागामार्फत टोल फ्री सुविधा १८००२२०११० या क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ६२४२६६६६ या हेल्पलाईनवर नागरिकांना तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सन २०१३ ते मार्च २०१७ या कालावधीत आटो‍रिक्षा, टॅक्सीचालकांविरुद्ध प्राप्त झालेल्या ५७१९ तक्रारींमध्ये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असून ४२०३ अनुज्ञप्ती निलंबित करण्यात आलेले आहेत. तसेच ४४३१ परवाने निलंबित करण्यात येऊन दंडही वसूल करण्यात आले आहे. आटो‍रिक्षा टॅक्सी चालकांच्या मनमानीविरुद्ध उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरीता आवश्यक ती दक्षता घेण्यात येत असल्याचे रावते यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विद्या चव्हाण, सदस्य हेमंत टकले, प्रवीण दरेकर,गिरीशचंद्र व्यास, प्रकाश गजभिये, विक्रम काळे यांनी भाग घेतला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom