परेवर फुकट्या प्रवाशांकडून १० कोटींचा दंड वसूल - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

15 March 2018

परेवर फुकट्या प्रवाशांकडून १० कोटींचा दंड वसूल


मुंबई । प्रतिनिधी - पश्चिम रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांवर फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कारवाईत १० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. फेब्रुवारी महिन्यात ८९ हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामधून पश्चिम रेल्वेने १० कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत तिकीट दलाला आणि इतर संशयित व्यक्तींविरुद्ध कारवाई केली. त्यामध्ये २३ लाख गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यामधून ९९ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ९.३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली आहे.

Post Top Ad

test
test