कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2018

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड

- इडक, क्षितीज आणि पळशीची पी.टी. यांचा समावेश -
मुंबई, दि.३१ मार्च २०१८ – मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने फ्रान्समध्ये दिनांक ८ मे ते १८ मे २०१८ या कालावधीत होणा-या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून पाठविण्यात येणा-या ३ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात इडक (मे.किया फिल्मस प्रा.लि.), क्षितीज (मे.मिडिया फिल्म क्राफट), पळशीची पी.टी. (मे.ग्रीन ट्री प्रोडक्शन) या चित्रपटांचा समावेश आहे. 

या चित्रपट महोत्सवाच्या चित्रपटांसाठी २६ मराठी चित्रपटांचे परिक्षण करण्यात आले. या २६ चित्रपटातून परिक्षण समितीने उपरोक्त ३ चित्रपटांची निवड कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी केली आहे.
सदर परिक्षण समितीमध्ये रघुवीर कुलकर्णी, (दिग्दर्शक, निर्माता), रेखा देशपांडे, (चित्रपट समिक्षक), अरुणा जोगळेकर, (पटकथाकार, दिग्दर्शक, निर्माता), प्रमोद पवार, (लेखक, अभिनेता), पुरुषोत्तम लेले, (निर्माता, दिग्दर्शक तथा महामंडळाचे अशासकीय सदस्य) या तज्ज्ञ सदस्यांचा समावेश आहे. या समितीने या ३ चित्रपटांची निवड केली आहे.

Post Bottom Ad