पालिका प्रशासनाविरोधात फायर ब्रिगेड अधिकाऱ्यांचे आंदोलन - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

16 March 2018

पालिका प्रशासनाविरोधात फायर ब्रिगेड अधिकाऱ्यांचे आंदोलन


मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल आगीच्या येथील घटनेनंतर अग्निशमन दलाच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केल्याने मुंबई फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशन संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेने आजपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामध्ये फक्त अधिकारी वर्गाचा समावेश असून, फायरमन कामावर हजर असतील, त्यामुळे मुंबईत कोणतीही घटना घडली तर काही अडचण येणार नसल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पालिकेचे 24 विभाग आहेत. या प्रत्येक विभागात फक्त 1 अधिकारी असतो. या अधिकाऱ्यावर सर्व कामाची जबाबदारी दिली जाते. विशेष म्हणजे अग्निशमन दलातील जवानांची हजेरी लावण्याचे काम देखील या अधिकाऱ्याकडे सोपवलं जाते त्यामुळे एकटा अधिकारी कशी काय एवढी काम करू शकतो असा सवाल देवदास यांनी उपस्थित केला आहे. सध्या एकाच अग्निशमन अधिकाऱ्याला अधिकार्याला अग्निप्रतिबंध उपाययोजना, अनुपालन कामे, आग विझवणे त्याच बरोबर लिपिक वर्गाचे काम, बायोमेट्रिक आणि इतर कामागारांच्या आस्थापणाचे काम देण्यात येत असल्याची माहिती देवदास यांनी पत्रकार पतिषदेत देत आज 24 तास अधिकारी काम करत असल्याचे सांगितले. याबाबत असोसिएशनने आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन सर्व प्रश्न मांडले मात्र त्यांनी आश्वासना शिवाय काहीच ठोस पाऊल उचलले नसल्यामुळे आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचे देवदास यांनी सांगितले. आतापर्यत मुंबई अग्निशमन दलाने मुंबईमधील लाखो आस्थापनांना "ना हरकत प्रमाणपत्रे" वितरित केलेली आहेत. त्या सर्व "ना हरकत प्रमाणपत्रा"चा कोणताही सुव्यस्थित अभिलेख अग्निशमन दलाकडे नाही. एखाद्या अस्थापनेला ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे किंवा नाही याबाबत संबंधित विभागाकडे तसेच अग्निशमन दल प्रशासनाकडे कोणतीही माहीत उपलब्ध नाही. संबंधित अस्थापनेला भेट देऊन त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यावे लागते. त्यामुळे अशा ना हरकत प्रमाणपत्राच्या अटी व शर्थीची पूर्तता करून घेणे एकट्या अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात पडते त्यामुळे कोणत्याही चुकीशीवाय नोकरी गमावण्याची भीती आधीकाऱ्यांना वाटू लागल्याची माहिती देवदास यांनी दिली.

Post Top Ad

test
test