दरोड्यांच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती – दीपक केसरकर - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 March 2018

दरोड्यांच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती – दीपक केसरकर


मुंबई, दि. ८ : औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर स्टेशन येथील चोरी तसेच दरोड्यांच्या घटनांच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज लक्षवेधीला उत्तर देताना विधानपरिषदेत केली.

सुभाष झांबड यांनी लासुर पोलीस स्टेशन येथील गुन्हेगारी घटनांसंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना केसरकर बोलत होते. ते म्हणाले, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून याप्रकरणी शासन गंभीर आहे. मी स्वतः येथे भेट देऊन आवश्यक ते दिशानिर्देश तपास यंत्रणांना देणार आहे. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सुनील तटकरे, सतीश चव्हाण, गिरीशचंद्र व्यास, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

Post Bottom Ad