विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी झिरो बॅलन्स बँक खाते - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

13 March 2018

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी झिरो बॅलन्स बँक खाते

मुंबई, दि. 13 : विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी झिरो बॅलन्स बँक खाते उघडण्याबाबत सर्व बँकांना निर्देश देण्यात येतील. केंद्र शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाला देण्यात येणारी शिष्यवृत्ती रकमेत व शिष्यवृत्तीसाठी राज्य शासनाच्या कोट्यामध्ये वाढ करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय व अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानपरिषदेत दिली. 

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास अडचण येत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य डॉ.सुधीर तांबे यांनी मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना श्री. कांबळे म्हणाले, शिष्यवृत्ती देण्याची कार्यपद्धती सुलभच आहे. परंतु यात सदस्यांच्या अधिकच्या सूचना आल्यास त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील. जिल्हा स्तरावर लीड बँकेची बैठक घेऊन संबंधितांना पालकमंत्र्यांच्या अन्वये सूचना देण्यात येतील. जेवढे अर्ज येतील तेवढ्या शिष्यवृत्ती देण्याबाबत तसेच राज्य शासनाचा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीचा कोटा 2 लाख 73 हजार आहे. हा कोटा वाढवून देण्याबाबत केंद्र शासनामार्फत प्रयत्न करण्यात येईल. या चर्चेत सदस्य विक्रम काळे, हेमंत टकले, हुस्नबानु खलिफे यांनी सहभाग घेतला होता.

Post Top Ad

test
test