AD BANNER

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ‘मुक्ती कोण पथे?’ पुस्तिकेचे वितरण


मुंबई | प्रतिनिधी - भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त दि. १४ एप्रिल रोजी दादर येथील चैत्यभूमी येथे सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘मुक्ती कोण पथे?’ या पुस्तिकेचे आणि कापडी पिशव्या, व मोतीचूर लाडूचे ऋणानुबंध अभियान तर्फे मोफत वितरण करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता यांच्या उपक्रमातून सामाजिक जाणीव, बांधिलकी लक्षात घेऊन ऋणानुबंध अभियानातर्फे प्रतिवर्षी विविध महामानवांची जयंती साजरी करण्यात येते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती उत्सवानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे ५०००(पाच हजार) ‘मुक्ती कोण पथे?’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके सोबत कापडी पिशव्या आणि मोतीचूर लाडू चे मोफत वितरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ऋणानुबंधचे अध्यक्ष डी.आर. कांबळे, सचिव पी.एस. पाटील, नरेंद्र पगारे, महेंद्र उबाळे, संजय जाधव, कल्याणराव गाडे व ऋणानुबंधचे सदस्य यांनी आयोजित केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post