बापमाणूसच्या शतकाचा आनंद स्वयंसेवी संस्थेच्या मुलांसोबत साजरा केला - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

13 April 2018

बापमाणूसच्या शतकाचा आनंद स्वयंसेवी संस्थेच्या मुलांसोबत साजरा केला


मुंबई / संतोष खामगांवकर -
युथफूल कन्टेन्टने सर्व रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. झी युवावरील प्रत्येक मालिका आणि त्यातील पात्रं ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भागच बनली आहेत. लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या आणि गावाचा बापमाणूस असलेल्या भल्या माणसाची ही गोष्टीने प्रेक्षांच्या मनात घर केले आहे. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा पार पाडला आणि हा आनंद त्यांनी फक्त बापमाणूसच्या टीम पर्यंत सीमित न ठेवता एका वेगळ्या प्रकारे साजरा केला.

यशस्वी १०० भागांचा टप्पा गाठल्याचा आनंद बापमाणूसच्या टीमने सक्षम सामुदायिक केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या मुलांसोबत साजरा केला. या मुलांनी आपुलकीने या बापमाणूसच्या कलाकारांचे स्वागत केले. लहानमोठ्यांमध्ये गप्पा आणि खेळांचे डाव रंगले तसेच या लहानग्यांसोबत कलाकारांनी केक कापून आनंद साजरा केला. इतकंच नव्हे तर बापमाणूसच्या टीमने या मुलांना वह्या आणि पुस्तकं यांची भेट दिली. मालिकेत संपूर्ण गावाची जबाबदारी घेणाऱ्या बापमाणसाने या मुलांना भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.

१०० भाग पूर्ण झाल्याचा हा आनंद व्यक्त करताना बापमाणूस रवींद्र मंकणी म्हणाले, "प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच आम्हा सर्व कलाकारांना मिळाले आहेत. आज आम्ही १०० भागांचे शिखर त्यांच्या प्रेमामुळेच गाठू शकलो. मालिकेतील बापमाणूस म्हणून मी साकारत असलेल्या पात्रावर अनेक जबाबदाऱ्या असतात आणि आज त्याच मालिकेच्या शतकपूर्तीचा आनंद या बापमाणसाने या मुलांसोबत त्यांच्या वयाचा होऊन साजरा केला. तुम्हा सर्वांचे प्रेम असेच असुदे कारण याच प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावर आम्ही १०० ते १००० भागांचा पल्ला गाठू."

बापमाणूसच्या यशस्वी शतकाबद्दल आणि या वेगळ्या सेलिब्रेशनबद्दल अभिनेता सुयश टिळक म्हणाला, "१०० भागांचा यशस्वी टप्पा गाठणे हा आम्हा सर्वांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि म्हणूनच हा आनंद आम्ही या निरागस मुलांसोबत साजरा करण्याचं ठरवलं. उद्याचं भविष्य असलेल्या या मुलांसोबत गट्टी जमली आणि आमच्या आनंदात ते देखील तितकेच समरस झाले. मी सक्षम सामुदायिक केंद्राचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला हा आनंद या मुलांसोबत साजरा करण्याची संधी दिली."

Post Top Ad

test
test