Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गुरुवार (12 एप्रिल) पासून बेस्टची दरवाढ ?


मुंबई । प्रतिनिधी - महागाईची आगीत होरपळणाऱ्या मुंबईकर नागरिकांना बेस्ट दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. बेस्टने आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बेस्ट दरवाढ सुचवाली आहे. तसा प्रस्ताव बेस्ट समिती, महापालिका सभागृहाने मंजूर केल्यानंतर मुंबई मेट्रोपोलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथाॅरिटी (एमएमआरटीए) पुढे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी मिळण्याची मिळणार असून येत्या 12 एप्रिल पासून दरवाढ लागू होणार आहे.

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून बेस्टची ओळख आहे. बेस्ट गेल्या काही वर्षात आर्थिक संकटात सापडली आहे. बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पालिका आयुक्तांनी कृती आरखडा बेस्टला दिला आहे. त्यात तिकीटांची दरवाढ सुचवली आहे. बेस्ट समितीने मंजुरी दिलेल्या दरवाढीनुसार पहिल्या दोन टप्प्यामध्ये कोणतीही वाढ झाली नसून त्यानंतर एक रुपयापासून 11 रुपयांपर्यंतही वाढ होणार आहे. बेस्टच्या बस पासमध्येही 70 ते 90 रुपयांची वाढ होणार असून विद्यार्थ्यांच्या बसपासमध्ये 50 रुपयांची वाढ सुचवण्यात आली आहे. एसी बसच्या तिकीटांत किमान 5 रुपयांची वाढ होऊ शकते. यानुसार बेस्टने काही दिवसांपूर्वीच बोरीवली, ठाणे, मुलुंड आणि खारघर ते वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान सुरू केलेल्या बसच्या तिकीटांमध्येही 15 ते 20 रुपयांची वाढ होऊ शकते. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीत व पालिका सभागृहात मंजूर झाला आहे. नियमाप्रमाणे दरवाढ करताना बेस्टला मुंबई मेट्रोपोलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथाॅरिटी (एमएमआरटीए) पुढे मंजुरीसाठी सादर करावा लागतो. तसा प्रस्ताव बेस्टने सादर करण्यात आला असून बुधवारी ट्रान्सपोर्ट अथाॅरिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैईठकीत दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी दरवाढीला मंजुरी मिळाल्यास पुढील 24 तासात म्हणजेच गुरुवारी 12 एप्रिलपासून बेस्टची दरवाढ लागू केली जाणार आहे.

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom