लालबागचा राजा मंडळाला ६० लाखाचा दंड - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

19 April 2018

लालबागचा राजा मंडळाला ६० लाखाचा दंड


मुंबई - नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेने ६० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड मंडळाने अद्याप पालिकेकडे जमा केलेला नाही. त्यामुळे हा दंड महापालिकेने त्वरित वसूल करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते बाळा वेंगुर्लेकर यांनी केली आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळाकडून अनेक ठिकाणी खड्डे पाडले जातात. गणेशोत्सव संपल्यावर नियमाप्रमाणे खड्डे बुजवण्याचे काम पालिकेने मंडळावर सोपवले आहे. मात्र लालबागचा राजा मंडळाकडून खड्डे बुजवले जात नसल्याचे माहीती अधिकारातुन उघड झाले आहे. मंडळाने सन २०१२ मध्ये ९५३ खड्डे पाडले होते. हे खड्डे वेळीच बुजवले नसल्याने पालिकेने मंडळाला २३ लाख ५६ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मंडळाकडून हा दंड भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पालिका दरवर्षी मंडळाला दंडाची रक्कम व्याजासह भरण्याची नोटीस बजावत असते. गणेशोत्सव जवळ आला असल्याने आतापर्यंत मंडळाला पालिकेने किती रुपयांचा दंड ठोठावला आहे, किंवा मंडळाने पालिकेकडे किती रुपयांचा दंड भरला आहे याची माहिती मागवली असता १५ ऑक्टोबर २०१७ पर्यंत व्याजसह ५८ लाख ३३ हजार ७३५ रुपये इतकी रक्कम मंडळ पालिकेला देणे आहे. २१ मार्च २०१८ पर्यंत व्याजासह ही रक्कम ६० लाख ५१ हजार ५८ रुपये इतकी होत असल्याचे एफ दक्षिण विभागाने कळविले आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने २०१२ पासून अद्याप पालिकेला ६० लाख ५१ हजार ५८ रुपये इतकी दंडाची रक्कम भरलेली नसल्याने ही रक्कम त्वरित वसूल करावी अशी मागणी वेंगुर्लेकर यांनी केली आहे.

Post Top Ad

test