Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मिलिंद एकबोटेंना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी


पुणे - कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी गुन्हे दाखल होऊन अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांना बुधवारी शिक्रापूर पोलिसांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या प्रकरणांच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले. यानंतर शिरूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगल, जाळपोळप्रकरणी गुन्हे दाखल असलेले हिंदू एकता आंदोलनाचे प्रमुख व पुण्याचे माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्रापूर पोलिसांनी बुधवारी एकबोटे यांना ताब्यात घेत शिरूर न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालय परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे शिरूर न्यायालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या वेळी मिलिंद एकबोटे यांच्या वतीने ॲड. चिंतामण घाटे, ॲड. सुयोग वाघ, ॲड. सुहास ढमढेरे यांनी, तर सरकारी वकील म्हणून ॲड. राऊत यांनी काम पाहिले. त्यांनतर एकबोटे यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom