मुंबईतील नद्यांचे पुनरुज्जीविकरण व सौंदर्यीकरण केले जाणार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

24 April 2018

मुंबईतील नद्यांचे पुनरुज्जीविकरण व सौंदर्यीकरण केले जाणार

मुंबई  - मुंबईतील नद्यांना गटारे आणि नाल्याचे स्वरूप आले आहे. यामुळे नद्यांचे पुनरुज्जीविकरण तसेच सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या अनुषंगाने दहिसर, पोयसर, वालभट तसेच ओशिवरा नद्यांना नवे रूप मिळणार आहे. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. तास प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. 

झोपडपट्टयातून टाकण्यात येणारे सांडपाणी, नदीकिनारच्या कारखान्यातून सोडण्यात येणारे रासायनिक पाणी, तबेल्यातून टाकण्यात येणारे जनावरांचे मलमूत्र यामुळे या नद्यांतील प्रदूषण मोठया प्रमाणात वाढल्याने नद्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. तेथील जलचर प्राण्यांनाही धोका निर्माण झाला आहे. नद्यांचे प्रदूषण दूर करून त्यांचे पुनरुज्जीविकरण तसेच सुशोभीकरण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. दरम्यान, नद्यांचे बकाल स्वरूप जाऊन नद्यांच्या पात्रातील भूजलाची पातळी वाढविणे, झोपडपट्टीतील सांडपाणी, कारखान्यातील रासायनिक पाणी, गाळे तबेल्यातील सांडपाणी, जनावरांचे मलमूत्र थांबवणे जलसंवर्धनासाठी त्याचप्रमाणे नद्यांच्या काठाचे सुशोभीकरण करण्याची गरज असल्याचे दिसून आले. त्यामुळे या नद्यांच्या पुनरुज्जीविकण व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यडीपीआर तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे.टंडन अर्बन सोल्युशन प्रा .लि. या संस्थेची निवड करण्यात आली आहे. दूषित पाण्याला नदीमध्ये येण्यापासून रोखणे, नदीच्या दोन्ही काठावर रस्ते बांधणे , नदीकाठचे तबेले व धोबीघाट काढणे, फूट ओव्हर ब्रिज बांधणे, नदीच्या पाण्याची जैविक गुणवत्ता सुधारणे, कांदळवन उद्यान बनवणे, नौकाविहार, पक्षीनिरक्षण मनोरा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

Post Top Ad

test