नियमांचे उल्लंघन करणारी 44 शौचालये पालिकेने घेतली ताब्यात

JPN NEWS
0

मुंबई - मुंबईमधील सशुल्क शौचालयांमध्ये नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली होती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 44 शौचालयांवर महापालिकेने कारवाई केली असून ही शौचालये महापालिकेने आपल्या ताब्यात घेतली आहेत. याठिकाणी निशुल्क शौचालये सुरु केली जाणार आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत 'पैसे भरा व वापरा' या संकल्पनेवर आधारित सशुल्क शौचालयांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सशुल्क शौचालयांना स्वतः भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करावी. या पाहणी दरम्यान सदर ठिकाणी स्वच्छता नसणे, निर्धारित दरापेक्षा अधिक शुल्क आकारणे किंवाशौचालयाचा नियमबाह्य वापर होणे; या तीनपैकी कोणतीही एक बाब आढळून आल्यास अशा शौचालयांना तात्काळ नोटीस देऊन ते ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु करावी. तसेच तीनपैकी कोणतेही उल्लंघन नसेल अशा शौचालयांवर वरीलप्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश पलिका आयुक्तांच्या आढाव बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात असणा-या 892 शौचालयांपैकी 44 ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने ती शौचालये महापालिकेने ताब्यात घेतली आहेत. या ठिकाणी निशुल्क शौचालये उभारण्यासंबंधी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. जी शौचालये ताब्यात घेण्यात येतील तेथे नवीन शौचालय बांधण्याच्या कार्यवाहीस व संबंधित निविदा प्रक्रियेस सुरुवात करावी. या नुसार बांधण्यात येणारी नवीन शौचालये निशुल्क शौचालये असतील. नवीन शौचालये बांधण्याची कार्यवाही करताना शौचालयांचे डिझाईन त्या परिसराची गरज ओळखून तयार करण्यात येईल. या शौचालयांचे डिझाईन हे अधिक सुविधाजनक व उपलब्ध जागेचा अधिक परिणामकारक उपयोग करणारे असावे असे पालिकेने म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)