रणांगण चित्रपटाचं आगळं वेगळं पोस्टर लाँच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 April 2018

रणांगण चित्रपटाचं आगळं वेगळं पोस्टर लाँच


मुंबई / संतोष खामगांवकर -
पूर्वी चित्रकलेच्या माध्यमातून चित्रपटांच्या पोस्टर्सला एक वेगळेपण मिळत होतं... पुढे बरेचसे बदल सिनेसृष्टीत होत गेले आणि पोस्टर रंगवणाऱ्या हातांची जागा कॉम्प्युटरच्या माऊसने घेतली... सगळंच आधुनिक झालं आणि या आधुनिकतेतून ही कला विस्मरणात गेली. याच कलेला खतपाणी घालण्याच्या उद्देशाने तोच नॉस्टॅल्जिआ पुन्हा निर्माण करत रणांगण चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाचं पोस्टर याच रंगांच्या सहाय्याने खुलवलं आहे.

पोस्टर डिझायनर सचिन गुरव यांच्या रंगांनी साकारलेल्या या पोस्टरवर संभ्रमात पडलेले सिध्दार्थ चांदेकर आणि प्रणाली घोगरे आपल्याला दिसतायत तर स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर यांच्या डोळ्यातला रोष रणांगणात सुरू होणाऱ्या युध्दाची जाणीव करून देत आहे. या पोस्टरची जमेची बाजू म्हणजे याने निर्माण केलेला एलपीज् च्या युगातला तोच नॉस्टॅल्जिआ.

आपल्या प्रमोशनदरम्यान सातत्याने वेगळेपण जपत आलेला 52 विक्स एंटरटेनमेंट निर्मित आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत रणांगण या चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली असून सहनिर्मिती अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी केली आहे.

कॉम्प्युटरच्या युगात लाँच झालेल्या या रंगीत पोस्टरने मोठमोठ्या एलपीज् च्या कव्हर्सची आठवण करून दिलेला रणांगण हा चित्रपट नात्यांची खरी बाजू मांडायला येत्या 11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Post Bottom Ad