नवी मुंबईत ‘शिकारी’ चित्रपटाचा भव्य प्रीमियर - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

24 April 2018

नवी मुंबईत ‘शिकारी’ चित्रपटाचा भव्य प्रीमियर


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, आमदार भाई जगताप आणि आमदार नरेंद्र पाटील आदी मान्यवरांनी लावली हजेरी
मुंबई / संतोष खामगांवकर -
नवी मुंबई येथे पहिल्यांदाच महेश वामन मांजरेकर प्रस्तुत आणि विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ या मराठी चित्रपटाचा भव्य प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. आयनॉक्स सिनेमास्, नवी मुंबई येथे पार पडलेल्या या सोहळ्याला अभिनेते महेश मांजरेकर, सुव्रत जोशी, नेहा खान, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, मृण्मयी देशपांडे, कश्मीरा शाह, भाऊ कदम, वैभव मांगले, भरत गणेशपुरे, दिग्दर्शक विजू माने आणि चित्रपटाचे निर्माते व आर्यन ग्लोबल एन्टरटेन्मेंटचे अध्यक्ष विजय पाटील हे कलाकार तसेच माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, आमदार भाई जगताप आणि आमदार नरेंद्र पाटील आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती. ‘शिकारी’ या बहुचर्चित मराठी चित्रपट २० एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. 

महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आघाडीचे दिग्दर्शक विजू माने करत आहेत. या चित्रपटाची बोल्ड पोस्टर्स सर्वत्र झळकली आणि या चित्रपटाची चर्चा सुरु झाली. ‘अ लाफ रायट, अ सेक्स कॉमेडी विथ अ मेसेज’ असे ब्रीदवाक्य घेवून ही पोस्टर्स झळकली आहेत. नेहा खान हिची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहे, तर तेवढीच महत्वाची भूमिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’फेम सुव्रत जोशीने यात साकारली आहे. त्यांच्याबरोबर भालचंद्र कदम, भरत गणेशपुरे आणि वैभव मांगले, कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे.

महेश मांजरेकर यांनी ‘शिकारी’चे सादरीकरण केले आहे आणि आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे विजय पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित परब, समीर म्हात्रे, शैलेंद्र बर्वे आणि चिनार महेश यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर, अखिल जोशी, जितेंद्र जोशी आणि कुमार यांनी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. या चित्रपटात पाच गाणी असून ती अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुली जोगळेकर, दिव्या कुमार, अपेक्षा धांडेकर आणि रिंकी गिरी यांनी गायली आहेत.

“शिकारी’चा विषय वेगळा आणि मस्त होता त्यामुळे त्यावर काम करायला मजा आली. तो एक विनोदी आणि संपूर्णतः व्यावसायिक चित्रपट आहे. विनोदाचे बादशाह दादा कोंडके यांना आम्ही वाहिलेली ती एक मानवंदना आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की, तुम्हाला आणि विशेषतः मुलींना जर या ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश करायचा असेल तर खुशाल या, पण आंधळेपाने वावरू नका.” असे “शिकारी’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता महेश वामन मांजरेकर म्हणाले.

‘शिकारी’चे दिग्दर्शक विजू माने म्हणतात, “स्त्रीत्वाचा गैरफायदा घेणाऱ्या श्वापदांनी भरलेल्या जंगलात अडकलेल्या एका देखण्या हरिणीची गोष्ट, असे काहीसे वर्णन या कथेचे करता येईल. ही गोष्ट सांगताना ती जितकी साधीसोपी आणि मनोरंजकपणे मांडता येईल तितकी ती मांडायचा प्रयत्न केला आहे. महेश मांजरेकर ह्या सिनेमात प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेत असले तरी हा सिनेमा आकार घेत असताना त्यांनी देलेले योगदान खूप खूप मोठे आणि अनुभवसिद्ध आहे.”

चित्रपटाचे निर्माते आणि आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे विजय पाटील म्हणाले, “शिकारी’च्या प्रदर्शनाची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. हा चित्रपट प्रख्यात दिग्दर्शक विजू माने यांनी दिग्दर्शित केला असून बहुआयामी व्यक्तिमत्व महेश मांजरेकर यांनी त्याचे सादरीकरण केले आहे. माझे वडील एस आर पाटील यांनी पूर्वी ‘बायको असावी अशी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यात माझ्या वडिलांनी मध्यवर्ती भूमिका ही केली होती. तो चित्रपट मनोरंजन आणि सामाजिक संदेश यांचे अचूक मिश्रण होते आणि आता २० एप्रिल २०१८ रोजी प्रदर्शित होत असलेला शिकारी’ या आमच्या चित्रपटातून आम्ही अशाच प्रकारची संकल्पना मांडली आहे.

Post Top Ad

test
test