अभिनेत्रीनं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत भररस्त्यात उतरवले कपडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2018

अभिनेत्रीनं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत भररस्त्यात उतरवले कपडे

हैदराबाद - तेलुगू चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी धडपडणारी अभिनेत्री श्री रेड्डीने शनिवारी हैदराबादच्या तेलुगू फिल्म चेंबर ऑफ कॉमर्ससमोर कपडे उतरवून आपली व्यथा मांडली. अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप श्री रेड्डी हिनं केला. तीन चित्रपटांमध्ये काम करूनही मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचं सदस्यत्व मिळालं नाही. सदस्यत्वासाठी अर्ज करूनही कार्ड देण्यात आलं नाही, असंही तिनं सांगितलं. चित्रपटात काम देतो असं सांगून काही व्यक्तींनी नग्न फोटो आणि व्हिडिओही मागितले होते. त्यानुसार पाठवलेले व्हिडिओ पाहूनही त्यांनी चित्रपटात काम दिलं नाही. इतकंच नाही तर लाइव्ह व्हिडिओही पाठवण्यास सांगितलं होतं. चित्रपटांत काम मिळावं म्हणून धडपडणाऱ्या अभिनेत्रींचं अशाच प्रकारे शोषण केलं जातं, असा आरोपही श्री रेड्डी हिनं केला. चित्रपटांत काम देतो असं प्रलोभन दाखवून तरुणींचं लैंगिक शोषण केलं जातं. माझंही लैंगिक शोषण करण्यात आलं आहे, अशी व्यथाही तिनं मांडली. दरम्यान पोलिसांनी श्री रेड्डीला ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येतं.   

Post Bottom Ad