AD BANNER

दलित वस्तीत महावितरण करणार विद्युतीकरण


मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त महावितरणच्यावतीने ‘सौभाग्य’ योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावांत ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा गावांत १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबिर घेण्यात येणार असून, या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मेदरम्यान संपूर्ण राज्यात ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘प्रधानमंत्री हर घर बिजली योजना’ अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून, ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post