जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

18 April 2018

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


मुंबई - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई यांच्यामार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडू यांच्या कार्याचे योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे याकरिता जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. सन 2017-18 यासाठी हे पुरस्कार असतील. याकरिता जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू, मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता यांनी दि. 31 मे 2018 या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावेत.

गुणवंत खेळाडू पुरस्काराकरीता मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य/राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेमधील पुरस्कार वर्षाच्या लगत पूर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीयस्तरावरील वरिष्ठ/कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी लक्षात घेण्यात येईल यापैकी उत्कृष्ट ठरणा-या तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल.

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराकरिता सतत दहा वर्ष क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्यांने वयाची30 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरिता त्या जिल्ह्यातील खेळाडूचीच कामगीर ग्राह्य धरली जाईल. गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामिण व महिला (पंचायत युवा क्रीडा खेल व अभियान) मधील राष्ट्रीयस्तरावरील पदकविजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात.

तसेच गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्काराकरिता क्रीडा संघटक, कार्यकत्याने सतत दहा वर्ष महाराष्ट्र क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असणे आवश्यक आहे. गुणांकणाकरिता त्या जिल्ह्यातील कामगीरी ग्राह्य धरली जाईल. क्रीडा कार्यकर्ते यांनी केलेल्या कामाचे मुल्यमापन पुढील तीन प्रकारे करण्यात येते. विकासात्मक कार्य - संघटक कार्यकर्ते यांच्या सक्रीय प्रयत्नातून अधिकृत खेळांची किती मैदाने त्यांच्या जिल्ह्यात उभारली गेली. किती व्यायाम शाळा, क्रीडा संस्था, संघटना स्थापन करण्यात आल्या. दहा वर्षात किती अधिकृत खेळाच्या राष्ट्रीय,राज्य, विभागीय, जिल्हास्तरीय भरविला व अर्जदाराची कोणती जबाबदारी होती ती स्पष्ट करावी.

जिल्हा क्रीडा पुरस्काराचे प्रस्ताव दि. 15 मे 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारले जाणार असून, दि. 15 मे2018 नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. यांची नोंद जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

Post Top Ad

test