झाडे पडण्याच्या घटना रोखण्यासाठी तज्ञ व्यक्तींची नेमणूक करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 April 2018

झाडे पडण्याच्या घटना रोखण्यासाठी तज्ञ व्यक्तींची नेमणूक करा


मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यादरम्यान झाडे पडण्याच्या दुर्घटना घडतात. यात मागीलवर्षी दोन जणांचा मृत्यू झाला होता. अशा दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने परिमंडळ निहाय वृक्ष प्राधिकरणातील तज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यीकडे केली आहे.

मुंबई शहर व उपनगरांमध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात वाढत्या सिमेंटीकरणामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या दुर्घटना घडतात. अचानक पडणाऱ्या झाडांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. या दुर्घटनांमध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. अशा अशा अपघातात आपली काही चूक नसताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. परिणामी त्याची जबाबदारी पालिकेवर येते. त्यामुळे पावसाळ्यात झाडे पडण्याच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी परिमंडळ निहाय वृक्षप्राधिकरणाच्या तज्ञ् व्यक्तीची नेमणूक पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी अशी मागणी रावी राजा यांनी केली आहे. तज्ञांची नेमणूक केल्यास त्यांच्या सूचनेनुसार झाडांना बळकटी आणण्यासाठी योग्य तो निर्णय घेता येणार असल्याने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा असे रवी राजा यांनी पालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Post Bottom Ad