AD BANNER

प्लास्टिक बॉटलची विल्हेवाट २१ दिवसात लावा - आयुक्त


मुंबई - राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली आहे. तरीही मुंबई महापालिकेच्या कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिक बॉटलचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. प्लास्टिक बंदी असल्याने महापालिकेच्या कार्यालयांमधून वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक बॉटलची विल्हेवाट २१ दिवसात लावण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहे.

मुंबई महापालिकेच्या कार्यालयांना नागरिक मोठ्या प्रमाणात कामानिमित्त भेटी देतात. पालिका कार्यालयांमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकही होत असतात. या बैठकांमध्ये सर्रासपणे प्लास्टिक पाण्याच्या बॉटल वापरण्यात येतात. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने आयुक्तांनी प्लास्टिक बॉटलची विल्हेवाट लावण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे दिले आहेत. महापालिकेच्या कार्यालयांमध्ये पाणी पिण्याचे यंत्र तसेच कुलर लावण्यात आले आहेत. त्यांच्या जलशुद्धतेची पाहणी करण्यात यावी. जरुरत असल्यास पाण्याचे शुद्धीकरण करण्यात यावे. पालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख तसेच कार्यालयीन सभा बैठकांमध्ये उपस्थितांना पाणी देण्यासाठी काचेचे जग, पेपर ग्लास यांचा वापर करावा, तसेच कार्यालय परिसर प्लास्टिक मुक्त असल्याचे सूचना फलक लावण्यात यावे असे परिपत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post