“सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

23 April 2018

“सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन


मुंबई / संतोष खामगांवकर -
सिनेमाचे प्रमोशन वैशिष्ट्यपूर्ण रितीने करण्यासाठी, आगामी मराठी सिनेमा सायकलचे सादरकर्ते- वायकॉम18 मोशन पिक्चर्स सिनेमाच्या कलाकारांसोबत आणि शहरातील काही सेलिब्रिटीं सोबत एका व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीला कलाकारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारची रॅली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पहील्यांदाच आयोजित करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय सायकल दिवसाच्या संध्याकाळी या नाविन्यपूर्ण रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि यात सिनेमाचे कलाकार आणि कर्मचारी सहभागी झालेले दिसणार आहेत- जसे की प्रियदर्शन जाधव, हृषिकेश जोशी, प्रकाश कुंटे, त्याच बरोबर लोकप्रिय मराठी अभिनेते तेजश्री प्रधान,ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, सोनाली खरे, अमृता खानविलकर तसेच कलर्स मराठी परिवारातील घाडगे अँड सून मधील अमृता आणि अक्षय म्हणजेच भाग्यश्री लिमये आणि चिन्मय उदगीरकर, राधा प्रेम रंगी रंगली मधील राधा म्हणजेच वीणा जगताप आणि कुंकू, टिकली आणि टॅटू राज – आदिश वैद्य आणि कामिनी – श्वेता पेंडसे आणि असेच अनेक जण उपस्थित होते. वायकॉम 18 मोशन पिक्चर्सचे सादरीकरण असलेल्या सायकलचे निर्माते आहेत हॅपी माइंड एंटरटेनमेंट आणि त्यात सहयोगी आहेत एमएफए वथिंक व्हाय नॉट, प्रसारित होणार आहे 4 मे 2018 रोजी.

Post Top Ad

test
test