आग वीजवण्यासाठी २६ ठिकाणी 'टँकर फिलिंग पॉइंट' - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

26 April 2018

आग वीजवण्यासाठी २६ ठिकाणी 'टँकर फिलिंग पॉइंट'


मुंबई - मुंबईत आगी लागण्याचे प्रमाण मोठे आहे. आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यासाठी जुन्या विहिरी, बोअरवेल, हायड्रंट इत्यादींवर टँकर फिलिंग पाँईंट बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. याअंतर्गत मुंबईतील २६ ठिकाणची जलस्त्रोत अग्निशमन दलाने नकाशावर आणली आहेत. उर्वरित २७ ठिकाणे लवकरच नकाशावर येतील, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

मुंबईत १० हजार ८४३ वॉटर हायड्रंट आहेत. त्यापैकी एक हजार ३५३ हायड्रंट सुरू आहेत. उर्वरित नऊ हजार २९० निकामी झाले आहेत. काही जमिनीत गाडले गेले असून काही विकास प्रक्रियेत नष्ट झाली आहेत. तशीच स्थिती विहिरी आणि बोअरवेलची आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा वापर करावा लागतो. आग विझवण्यासाठी वापरलेले पिण्याचे पाणी वाया जाते. सध्या जलस्रोतांची पुरेशी माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे जलस्त्रोतांचे नकाशे तयार करुन त्यांच्या निश्‍चित ठिकाणांची आणि स्थितीची माहिती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार सध्या ज्या विहिरी, बोअरवेल अस्तित्वात आहेत. त्याचे पाणी आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी टॅंकर फिलिंग पॉईंट अंतर्गत जलस्त्रोतांचा शोध अग्निशमन दलाने सुरु केला आहे. जलस्रोतांची माहिती जमा करून ती आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या संकेतस्थळावर टाकावी, असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. या आदेशानुसार अग्निशमन दलाने फायर फायटिंगसाठी मुंबईतील जलस्त्रोतांचा शोध घेत आहे. सध्या २६ टँकर फिलिंग पॉईट लावण्यात आले आहेत. मात्र ते पुरेसे नसल्याने त्यात वाढ करण्याचे पालिकेचे उद्दिष्टे आहे. शहरासह उपनगरात ५३ नकाशे तयार केली जाणार असून २६ ठिकाणचे मॅपिंग झाले आहे. उर्वरित २७ ठिकाणे लवकरच नकाशावर आणली जातील, अशी पालिका अग्निशमन दलाने दिली. जलस्त्रोतांच्या मॅपिंगमुळे आपत्कालिन स्थितीत त्याचा तात्काळ वापर करणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Post Top Ad

test