पुरातन वास्तु विकसित करणाऱ्या विकासकांना फायदा - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

26 April 2018

पुरातन वास्तु विकसित करणाऱ्या विकासकांना फायदा


मुंबई - मुंबईत अनेक पुरातन वास्तु आहेत. या वास्तूचे जतन करताना अनेक अडचणी येत होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी नव्या विकास आराखड्यात तरतूद केल्याने पुरातन वास्तु जतन करणे सोपे होणार आहे. यामुळे पुरातन वास्तु विकसित करणाऱ्या विकासकांचाही चांगलाच फायदा होणार आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी पुरातन वास्तू आहेत. या वास्तूचे जतन करताना त्या वास्तू इतकाच टीडीआर विकासकाला दिल जात होता. यामुळे कोणताही विकासक पुरातनवास्तु चे जतन करण्याच्या कामात पुढे येत नव्हता. मात्र नव्या विकास आराखड्यात वास्तु इतका टीडीआर न देता भूखंडाच्या प्रमाणात टीडीआर दिला जाणार आहे. यामुळे विकासक पुरातन वास्तु चे जतन करताना त्याचा टीडीआर त्या वास्तुसाठीच वापरातील. मात्र उर्वरित टीडीआर विकासकाला मुंबईत कुठेही वापरता येणार आहे. मुंबईत सर्व विभागातील टीडीआरचे दर ठरले आहेत. त्यानुसार कोणत्या विभागात टीडीआर वापरायचा हा अधिकार त्या विकासकाला असणार आहे. यामुळे विकासक पुरातन वास्तुचे जतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येतील असा विश्वास महापालिकेला आहे.

कसा मिळेल टीडीआर -
एकादी पुरातन वास्तु २०० चौरस मीटरची आहे. मात्र त्याच्या भूखंडाचे प्रमाण ५०० चौरस मीटर इतके आहे. विकासकाला आधी फक्त २०० चौरस मीटरचा टीडीआर दिला जात होता. आता त्यात बदल करून विकासकाला ५०० चौरस मीटरचा टीडीआर मिळणार आहे. त्याबदल्यात विकासक पुरातन वास्तुचे २०० चौरस मीटरमध्ये जतन करून इतर म्हणजेच ३०० चौरस मीटरचा टीडीआर मुंबईत त्याला हवे त्या ठिकाणी वापरू शकणार आहे.

Post Top Ad

test