टाटा स्काय घेऊन येत आहे अमिताभ बच्चन यांच्या साथीने मॅक्झिमम एंटरटेनमेन्ट कँपेन - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 May 2018

टाटा स्काय घेऊन येत आहे अमिताभ बच्चन यांच्या साथीने मॅक्झिमम एंटरटेनमेन्ट कँपेन


मुंबई / संतोष खामगांवकर -
यंदाच्या क्रिकेट मोसमासाठी टाटा स्कायने मेगास्टार अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेली ‘#HarSceneKaMazaaLo’ ही एक नवी कोरी जाहिरात मोहीम प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. टाटा स्कायकडून पुरविले जाणारे मनोरंजन किती सखोल आणि सर्वांगिण आहे, हे सहज आवडून जाईल आणि लक्षात राहील अशा शैलीत सांगणाऱ्या या जाहिरातींमध्ये अमिताभ बच्चन एका टीकाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. एकूण नऊ भागांची ही जाहिरात संपूर्ण मे महिनाभर टप्प्याटप्प्याने प्रसारित केली जाणार आहे.

टाटा स्कायचे चीफ कम्युनिकेशन ऑफिसर मलय दिक्षित म्हणाले, “टाटा स्कायकडे केवळ टीव्हीच नव्हे तर मोबाइल ॲप्सद्वारे उपलब्ध असलेल्या मनोरंजनाच्या प्रकारांना वाहिलेले चॅनल्स प्रचंड संख्येने आहेत. आमच्या या मनोरंजन मंचाकडून प्रेक्षकांना सतत काहीतरी नवे,काहीतरी नवलाईचे मिळत राहील हे ग्राहकांना सांगावे अशी कल्पना आमच्या मनात होती. आमच्या ताज्या जाहिरात मोहिमेमधून अमिताभ बच्चन याच गोष्टीचे प्रात्यक्षिक देताना दिसतील. आमच्या ग्राहकांना टाटा स्कायकडून मिळणारे अखंड मनोरंजन आणि टीव्ही पाहण्याचा अद्ययावत अनुभव या गोष्टींना या जाहिरातींमधून अधोरेखित करण्यात आले आहे. “

अथकपणे टीव्हीच्या पडद्यासमोर बसणारे बिंज वॉचर्स म्हणजे स्वयंघोषित टीकाकार असतात. याच आवेशात बिग बीसुद्धा त्यांना आवडणाऱ्या चित्रपटांमधील तारे-तारकांवर टीका करताना या जाहिरातींमध्ये दिसणार आहेत. ८१ हून अधिक मूव्ही चॅनल्स आणि एकूण ६०० चॅनल्स व सेवा यांच्यासह टाटा स्काय ग्राहकांना त्यांनी निवडलेल्या रकमेच्या पॅकेजमध्ये भरभरून मनोरंजन आणि मौज देऊ करते. यात भर म्हणजे टाटास्काय मोबाइल ॲपच्या मदतीने कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दोन नोंदणीकृत उपकरणांवर एकाच वेळी वेगवेगळे कार्यक्रम पाहता येत असल्याने एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या आवडीनिवडी जपणाऱ्या सदस्यांना त्यांच्या आवडीचे कार्यक्रम पाहता येतात आणि मनोरंजनाचा आस्वाद घेता येतो.

Post Bottom Ad