बेस्टमध्ये महाव्यस्थापक विरुद्ध समिती सदस्य वाद - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

04 May 2018

बेस्टमध्ये महाव्यस्थापक विरुद्ध समिती सदस्य वाद


प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांना परिणाम भोगावा लागणार
मुंबई - मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट उपक्रमामध्ये सध्या बेस्ट समिती सदस्य विरूद्ध महाव्यवस्थापक असे वातावरण निर्माण झाले आहे. मागील बैठकीत भाजपाचे जेष्ठ सदस्य सुनील गणाचार्य आणि महाव्यवस्थापक यांच्यामधील वाद रंगला होता. आता पुन्हा ट्रायमॅक्स या कंपनीवरून महाव्यवस्थापकांविरोधात समिती सदस्यांनी दंड थोपटले आहेत. महाव्यवस्थापक व समिती सदस्य यांच्यामधील वाद वाढत चालल्याने याचा परिणाम मात्र बेस्टचे कर्मचारी व प्रवाशांना भोगावा लागणार आहे.

बेस्ट उपक्रमात तिकीट वाटपाच्या मशीन पुरवणे, पास चेकिंग करणे, संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे काम ट्रायमॅक्स या कंपनीला २०१२ मध्ये देण्यात आले होते. याचा कंत्राट कालावधी ऑक्टोबर २०१७ मध्ये संपला आहे. कंत्राट कालावधी संपला तरी तिकीट वाटप व्यवस्था सुरु राहावी म्हणून १ नोव्हेंबर २०१७ ते ३० जून २०१८ पर्यंत कंत्राट वाढवण्याचा प्रस्ताव समितीमध्ये सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना माजी समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी महाव्यवस्थापक मनमानी कारभार करत असून त्यांच्या आडमुठेपणामुळे दिवसाला लाखो रुपयांचा तोटा होत असल्याचा आरोप केला. 

२०१७ मध्ये ट्रायमॅक्सला चार हजार नवीन तिकीट मशीन पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले. या मशीन अत्याधुनिक नसल्याचे सांगत महाव्यवस्थापकांनी परत पाठवल्या. महाव्यवस्थापकांना ट्रायमॅक्सला दिलेले कंत्राट रद्द करावयाचे असले तरी कोणतेही कंत्राट मध्येच रद्द करता येत नाही. हे माहित असतानाही बेस्टला खड्ड्यात घालण्याचे काम महाव्यवस्थापक करत आहेत. महाव्यवस्थापकांनी कोणालाही पूर्वसूचना न देता नवीन कंत्राटासाठी जाहिरात काढली आहे. याप्रकरणी कंत्राटदार न्यायालयात गेल्यास त्याला महाव्यवस्थापक जबाबदार असतील असे कोकीळ म्हणाले.

ट्रायमॅक्सच्या ६५ टक्के मशीन बंद व नादुरुस्त आहेत. येत्या काही दिवसात सर्वच मशीन बंद पडून गोंधळाची परिस्थिती निर्मण होईल असे कोकीळ यांनी समितीच्या निदर्शनास आणले. महाव्यवस्थापकांनी ट्रायमॅक्सबाबतीत स्थापन केलेल्या उपसमितीचा अहवाल मान्य केलेला नाही. मात्र नवीन कंत्राटासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. नवीन कंत्राट बेस्ट समिती समोर आल्यास त्याला विरोध केला जाईल असा इशारा कोकीळ यांनी दिला.

दरम्यान मुंबईत एकत्रित तिकीट पद्धत अंमलात येणार असल्यामुळे नवीन पद्धतीनुसार मशीन आवश्यक असल्याने आपण नवीन कंत्राट मागवल्याचा खुलासा महाव्यस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी केला. त्यामुळे येत्या काळात बेस्ट महाव्यस्थापक व समिती सदस्य यांच्यामध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Post Top Ad

test