Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गोरेगाव टेक्निक प्लस आगीत ३ जणांचा मृत्यू, ९ जखमी


मुंबई । जेपीएन न्यूज -
गोरेगाव पश्चिम येथील एस.व्ही .रोडवरील टेक्निक प्लस या व्यावसायिक इमारतीतील ७ व्या मजल्यावर रविवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत ३ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या अधिकारी जवानांचा समावेश आहे.

गोरेगाव पश्चिम येथील एमटीएनएल ऑफिसजवळील पवनबाग येथे टेक्निक प्लस ही १२ मजली बिल्डिंग आहे. ही व्यावसायिक बिल्डिंग असून या इमारतीत अनेक कार्यालये आहेत. ही संपूर्ण इमारत काचेची आहे.आज ४ वाजून २४ मिनिटांनी या इमारतीच्या ७ व्या मजल्यावर आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित मदतकार्य हाती घेतले. पोलीस तसेच रिलायन्स एनर्जीचे कर्मचारीही घटनास्थळी रवाना झाले. काही वेळातच ही आग झपाट्याने पसरली. आगीची व्याप्ती लक्षात घेऊन अग्निशमन दलाने ५ वाजून ३ मिनिटांनी भिषण आग असल्याचे (३ नंबर लेव्हलची आग) घोषित केले. आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीच्या उसळलेल्या ज्वाळा व प्रचंड प्रमाणात पसरलेला धूर यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे अग्निशमन दलाच्या जवानांना मोठे अवघड होऊन बसले. १२ फायर इंजिन व ६ वॉटर टँकर च्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करता रात्री १० वाजून ५७ मिनिटांनी नियत्रंण मिळवण्यात यश आले. आगीच्या दुर्घटनेत इमारतीमध्ये अडकलेल्या ४ जणांना अग्नीशमन दलाने सुखरूप बाहेर काढून पालिकेच्या सिद्धार्थ रुग्णालयात पाठवले. चौघांपैकी एकावर उपचार करून सोडून देण्यात आले आहे तर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे डॉ. वाडे यांनी सांगितले. आग विझवताना धुरामुळे घुसमटल्याने अग्निशमन दलाच्या ४ जवान व अधिकाऱ्यांना सिद्धार्थ रुग्णालयात उपचासाठी भरती करण्यात आले आहे. त्यापैकी एका जण आयसीयूमध्ये आहे. तर ४ जणांवर १०८ च्या रुग्णवाहिकेट उपचार करण्यात आले. दरम्यान आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी पुढील तपस सुरु आहे. 

मृतांची नावे -
नईमुद्दीन शाह २५ वर्षे
रामवतार ४५ वर्षे
राम तीर्थपाल ४५ वर्ष

जखमींची नावे -
रॉबिन्सन सुवारीस ४८ वर्षे
शिवाजी मंदाडे ३२ वर्षे
श्रीराम नरहारे ३५ वर्षे आयसीयू
मारुती अराटे २४ वर्षे
वासिम सलमानी ३५ वर्षे
सोनावणे आणि ३ अग्निशमन दलाच्या जवानांना १०८ च्या रुग्णवाहिकेत उपचार करून सोडून देण्यात आले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom