जेजेमधील डॉक्टरांचे आंदोलन सोमवारीही सुरुच राहणार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

20 May 2018

जेजेमधील डॉक्टरांचे आंदोलन सोमवारीही सुरुच राहणार


मुंबई - जेजे रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मार्ड या संघटनेने शनिवारी आंदोलन सुरु केले. रविवारी दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्याने सोमवारीही आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा मार्डने दिला आहे.  

काय आहे प्रकरण - 
जे.जे. रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी दोन डॉक्टरांसह एका महिला कर्मचार्‍याला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यामध्ये एक डॉक्टर गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करीत जे.जे.मधील ४०० निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेली मारहाण आणि तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये वैâद झाला आहे. या विरोधात डॉक्टरांनी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात ‘मार्ड’च्या वतीने एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. पालिका रुग्णालयांतीमधील डॉक्टरांना मारहाण होण्याच्या घटना वारंवार घडत असताना प्रशासन डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करीत नसल्याचा आरोप ‘मार्ड’ने केला आहे. गेल्या वर्षी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर प्रशासनाने सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आतापर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता जोपर्यंत डॉक्टरांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे मार्ड कडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान रविवारी रुग्णालयात आलेल्या गंभीर रुग्णांवर प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक यांनी उपचार केले.

बैठक निष्फळ, आंदोलन सुरूच राहणार - 
दरम्यान संपावर तोडगा काढावा म्हणून डीएमईआर उपसंचालक डॉ. वाकोडे, जेजे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. एस. डी. नणंदकर, मार्डचे जे. जे मधील अध्यक्ष सारंग दोनारकर आणि निवासी डॉक्टरांचे प्रतिनिधी यांची रविवारी बैठक संपन्न झाली. यात कोणताही तोडगा न निघाल्याने निवासी डॉक्टर आंदोलनावर ठाम आहेत. प्रत्येक वार्डमध्ये सुरक्षारक्षक नेमल्याशिवाय सामूहिक रजा आंदोलन मागे घेणार नाही. रविवारी मध्यरात्रीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सोमवारीही आंदोलन कायम राहील. ओपीडीतील रुग्णांना त्रास होवू नये यासाठी समांतर ओपीडी चालवू अशी माहिती डॉ. सारंग दोनारकर यांनी दिली. 

Post Top Ad

test