कमला मिल आग - अहवाल ३१ ऑगस्टपर्यंत न्यायालयात सादर केला जाणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 May 2018

कमला मिल आग - अहवाल ३१ ऑगस्टपर्यंत न्यायालयात सादर केला जाणार


मुंबई - कमाला मिल परिसरातील दोन पबला लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी न्यायालयाने चौकशी समिती नेमली आहे. शनिवारी या समितीने दुर्घटना स्थळाची पाहणी केल्यावर आपला अहवाल ३१ ऑगस्टपर्यंत न्यायालयाला सादर करणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली.

कमला मिल परिसरातील वन अबव्ह व मोजोस या दोन पबला २९ डिसेंबरला मध्यरात्री आग लागली होती. या आगीमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पबच्या मालकांना पोलिसांनी अटक केली आहे. या आगीची चौकशी सीबीआय कडून करावी या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालायने एप्रिल महिन्यात त्रि‍सदस्‍यीय चौकशी समिती गठीत केली आहे. निवृत्त मुख्य न्यायमूर्ती ए. व्ही. सावंत यांच्या अध्यक्ष असलेल्या या समितीत वास्तुविशारद वसंत ठाकूर, पालिकेचे माजी आयुक्त व सनदी अधिकारी के. नलीनाक्षन यांचा समावेश आहे. या त्रिसदस्सीय समितीने कमला मिलमध्ये घटनास्थळाला शनिवारी भेट दिली. समिती सदस्यांनी घटना स्थळाची पाहणी अर्धा ते पाऊण तास केली. 

आगीची घटना घडली तेव्हा बाहेर पडण्याचा मार्ग न भेटल्याने मृत्यूचा आकडा वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. याची सत्यता पडताळण्यासाठी समिती सदस्यांनी पबकडे लिफ्टने जाऊन खाली उतरताना पायऱ्यांचा वापर केला. समिती सदस्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले असले तरी न्यायालयाच्या आदेशाने आज घटना स्थळाची पाहणी केली, ३१ ऑगस्टपर्यंत आमचा अहवाल न्यायालयाला सादर करू असे सांगितले. पोलिसांनी घटना स्थळाच्या केलेल्या पंचनाम्याची चौकशी समितीकडून केली जाणार आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आग लागलेल्या ठिकाणावरून आगीत भक्षस्थानी पडलेले बरेच सामान हलवण्यात आले असल्याने फक्त जागेची पाहणी करुनच अहवाल तयार करावा लागणार आहे. या भेटीदरम्यान पालिकेचे उपायुक्त (सुधार) चंद्रशेखर चौरे, जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन तसेच स्थानिक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Post Bottom Ad