मुंबईत दोन वर्षाखालील २३ टक्के मुलं कुपोषित - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

27 May 2018

मुंबईत दोन वर्षाखालील २३ टक्के मुलं कुपोषित


मुंबई । जेपीएन न्यूज -
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दोन वर्षाखालील २३ टक्के मुलं कुपोषित असल्याचे निदर्शनास आले आहे. टाटा मेमोरिअल हॉस्पिटलने केलेल्या सर्वेक्षणामधून ही बाबा उघड झाली आहे. अर्ध्याहून जास्त बालकं जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यात आईच्या दूधापासून पूर्णतः पोषण न मिळाल्याने कुपोषित राहिले असल्याचे सर्वेक्षणानुसार स्पष्ट झाले आहे.
    
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल व राज्य सरकारने एक सर्वेक्षण केले आहे. तीन वर्षातील संशोधनानंतर एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरातील दोन वर्षाखालील मुलांचा समावेश करण्यात आला होता. यात शहरातील ३२ हजार २५८ मुलांची केली चाचणी करण्यात आली. मुंबई, नाशिक, नागपूर आणि मालेगाव या शहरांचा यात समावेश आहे. मुंबईतील खार आणि सांताक्रूझ परिसरातील ६ हजार ३१६ बालकांची तपासणी करण्यात आली. सर्वाधीक लोकवस्ती असलेल्या या परिसरात कुपोषित मुलांची संख्या १७० इतकी असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणानुसार मुंबईपेक्षा छोट्या शहरातील मुलं जास्त सुदृढ असल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील अर्भकं आणि बालकांमध्ये २३ टक्के कुपोषितांचा समावेष असून हा आकडा राज्यातील इतर शहरांच्या आकडेवारीपेक्षा २० टक्क्यांनी जास्त असल्याचे अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे. तज्ञ्जांच्या माहितीनुसार केवळ आदिवासी आणि खेडेगावातील बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त असते, हा दावा या सर्वेक्षणामुळे फोल ठरला आहे. 

Post Top Ad

test